Lokmat Sakhi >Social Viral > ७२ वर्षीय सुधा मूर्ती जेव्हा 'बरसो रे मेघा' गाण्यावर ताल धरतात... व्हायरल व्हिडियो.. इन्फोसिस मधील खास क्षण...

७२ वर्षीय सुधा मूर्ती जेव्हा 'बरसो रे मेघा' गाण्यावर ताल धरतात... व्हायरल व्हिडियो.. इन्फोसिस मधील खास क्षण...

Sudha Murty dancing with Shreya Ghoshal at Infosys at 40 event : सुधा मुर्तींसाठी 'साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी' ही म्हणं लागू होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2022 12:37 PM2022-12-16T12:37:53+5:302022-12-16T12:43:20+5:30

Sudha Murty dancing with Shreya Ghoshal at Infosys at 40 event : सुधा मुर्तींसाठी 'साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी' ही म्हणं लागू होते.

When 72-year-old Sudha Murthy dancing on the song 'Barso Re Megha'... Viral Video.. Special moment at Infosys... | ७२ वर्षीय सुधा मूर्ती जेव्हा 'बरसो रे मेघा' गाण्यावर ताल धरतात... व्हायरल व्हिडियो.. इन्फोसिस मधील खास क्षण...

७२ वर्षीय सुधा मूर्ती जेव्हा 'बरसो रे मेघा' गाण्यावर ताल धरतात... व्हायरल व्हिडियो.. इन्फोसिस मधील खास क्षण...

कॉटनची फिकट रंगाची साधी साडी, केसांचा अंबोडा, डोळ्यावर साध्या फ्रेमचा चष्मा, कपाळावर टिकली, मोठेपणाचा तसूभरही लवलेश नाही. अशा सुधाताईंसाठी 'साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी' ही म्हणं लागू होते. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री खंबीर उभी असते असं म्हटलं जात. म्हणजेच त्या पुरुषाच्या यशामध्ये त्या स्त्रीचा देखील तितकाच वाटा असतो. इन्फोसिस फाऊंडेशनचे सर्वेसर्वा नारायण मूर्तीआणिसुधा मूर्ती यांनी या ओळींचा अर्थ खरा करून दाखविला आहे. शून्यातून विश्व उभं करणाऱ्या या जोडप्याला आपण सगळेच ओळखतो(Sudha Murty dancing with Shreya Ghoshal at Infosys at 40 event).

सुधा मूर्तींविषयी थोडस... 

सुधा मूर्ती यांचा जन्म कर्नाटक राज्यातल्या शिग्गावि येथे झाला. त्यांनी कॉम्पुटर सायन्स या विषयातील एम. टेक. ही पदवी प्राप्त केली आहे. पुणे येथील 'टेल्को' कंपनीत निवडल्या गेलेल्या त्या पहिल्या स्त्री अभियंत्या होत्या. त्या विख्यात सामाजिक कार्यकर्त्या आणि कुशल लेखिका आहेत. १९ नोव्हेंबर २००४ मध्ये त्यांना समाजकार्याच्या क्षेत्रातील त्यांच्या असामान्य योगदानाबद्दल 'राजलक्ष्मी पुरस्कार' मिळाला. २००६ मध्ये त्यांना भारत सरकारतर्फे 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुधा मूर्ती यांना सामाजिक कार्य आणि साहित्यसेवेसाठी सहा डॉक्टरेट्स मिळाल्या आहेत. यापैकी दोन डॉक्टरेट्स महाराष्ट्रातील एस. एन. डी. टी महिला विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यातर्फे देण्यात आल्या. कर्नाटकातील गुलबर्गा विद्यापीठाकडून साहित्य क्षेत्रातील कार्यासाठी एक आणि कर्नाटक विद्यापीठाकडून एक अशा दोन डॉक्टरेट्स त्यांना बहाल करण्यात आल्या. तामिळनाडूतील सत्यभामा विद्यापीठाने आणि आंध्रप्रदेशातील श्री पद्मावती विश्वविद्यालयानेही त्यांना डॉक्टरेट्स देऊन सन्मानित केले. 

हा होता खास क्षण ... 

नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांनी २ जुलै १९८१ रोजी सुरु केलेल्या इन्फोसिस फाऊंडेशनला यंदा ४० वर्ष पूर्ण होत आहेत. या खास क्षणाचे सेलिब्रेशन करण्यासाठी त्यांनी बंगळुरू मधील इन्फोसिसच्या हेडक्वार्टर्स मध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. काही खास लोकांना आमंत्रित करून त्यांनी हा क्षण साजरा केला. या खास पाहुण्यांमध्ये सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल उपस्थित होती. या प्रसंगी श्रेया घोषालने गायलेल्या गाण्यावर चक्क सुधा मूर्ती यांनी ताल धरला आहे. 

 

नक्की काय आहे या व्हिडिओमध्ये... 

या व्हिडिओमध्ये सुधा मूर्ती सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आणि इतर काही मंडळींसोबत उभ्या आहेत. श्रेया घोषाल आपल्या सुरेल आवाजात मणिरत्नम यांच्या 'गुरु' या चित्रपटातील 'बरसो रे मेघा'  हे गाणे गात आहे. आणि सुद्धा मूर्ती यांनी या गाण्यावर ताल धरून चक्क नाचायला सुरुवात केली आहे. यावेळी सुधा ताईंच्या आसपास असणाऱ्या व्यक्तींनीसुद्धा टाळ्या वाजवत ताल धरायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत आपण सुधा मूर्तींना केवळ प्रेरणादायी गोष्टींवर भाष्य करताना पाहिलं आहे. परंतु आज त्याच सुधा मूर्ती आपल्या गाण्यावर ताल धरत आहेत हा क्षण मोबाईलमध्ये कैद करण्याचा मोह सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषालला सुद्धा आवरला नाही. श्रेयाने जवळ असणाऱ्यांपैकी एकाच्या हातात आपला मोबाईल देऊन हा क्षण रेकॉर्ड करण्यास सांगितला.   

नारायण मूर्ती यांच्या तोंडून पत्नीचे कौतुक... 

या प्रसंगी मुलाखती दरम्यान नारायण मूर्ती यांनी सुधा मूर्तींचे कौतुक करताना म्हटले की, "मी जेव्हा इन्फोसिस फाऊंडेशनच्या उभारणीत व्यस्त होतो तेव्हा माझ्या अनुपस्थितीत सगळ्या जबाबदाऱ्या सुधा मूर्ती यांनी पार पाडल्या. एवढेच नव्हे तर आपल्या लग्नाबाबतच्या आठवणी देखील मनमोकळेपणाने सांगितल्या. आमच्या कामात कितीही व्यस्त असलो तरीही आम्ही एकमेकांना वेळ देतो, तरीपण आम्ही एकमेकांचे मेल कधीही चेक करत नाही. असं सुधा मूर्तींनी यावेळी सांगितलं.

Web Title: When 72-year-old Sudha Murthy dancing on the song 'Barso Re Megha'... Viral Video.. Special moment at Infosys...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.