हत्ती त्याच्या आकारमानामुळे जंगलातील सगळ्यात ताकदवान प्राणी मानला जातो. इतर प्राण्यांपेक्षा उंच, जाडजूड, मोठे अणकुचीदार सुळे, लांब सोंड यामुळे इतर प्राण्यांच्या तुलनेत हत्तीच्या अंगी भरपूर बळ असत. वाढत्या शहरीकरणामुळे जंगल नष्ट होत आहेत. त्यामुळे हत्ती कधी कधी शहरात येऊन माणसांवर हल्ला करतात. तर कधी सर्कशीत रिंग मास्टरच्या धाकाने वेगवेगळे खेळ दाखवून लहान मुलांचे मनोरंजन करतात. लग्नाच्या वरातीत नवऱ्याला ऐटीत आपल्या पाठीवर बसवून मिरवणारा हत्ती देखील आपण पाहिला असेल. जंगलातील झाडांच्या जड ओंडक्यांची ओझी सुद्धा तो अगदी सहजरित्या वाहतो. असं म्हणतात प्राण्यांना देखील माणसांप्रमाणे भावना असतात. ते सुद्धा आपल्याप्रमाणे रागावतात, हसतात, आनंदी होतात. असाच एक आजारी पडलेला हत्ती जेव्हा डॉक्टरांकडे येतो आणि डॉक्टरांना कसा प्रतिसाद देतो याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. एरव्ही जंगलात थाटात फिरणारा हत्ती जेव्हा आजारी होऊन आपण रुग्ण असल्याच्या भावनेने हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा नक्की काय होतं? हे व्हिडीओ पाहून लक्षात येते.
I am sure you have never seen such a cooperative patient coming in for an X-Ray pic.twitter.com/UNmhSIrXOr
— Kaveri 🇮🇳 (@ikaveri) December 7, 2022
या व्हिडिओत, डॉक्टर हत्तीला हॉस्पिटल मध्ये घेऊन येत आहेत. त्याचा X - RAY काढण्यासाठी त्याला X - RAY रूममध्ये आणलं असता, शहाण्या मुलासारखं तो डॉक्टरांचं ऐकत आहे. एखाद्या रुग्णाला समजावून सांगणं जितकं सोपं तितकं प्राण्यांना समजावणं अवघड आहे. त्या प्राण्याची मानसिकता नीट समजून घेऊन त्याच्यावर उपचार करणे म्हणजे डॉक्टरांसाठी मोठा टास्क आहे. हत्तीसारखा महाकाय प्राणी जेव्हा रुग्णालयात येतो, तेव्हा तो किती आज्ञाधारक होऊन डॉक्टरांच्या उपचारांना साथ देतो, याचा उत्तम नमुना या व्हिडिओत पाहायला मिळतो. डॉक्टरांना त्रास देणाऱ्या, उलट बोलणाऱ्या, शिवीगाळ करणाऱ्या रुग्णांना हा आज्ञाधारक हत्ती एक चांगला संदेश देत आहे.
कावेरी नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. X - RAY साठी आलेला इतका समजूदार रुग्ण तुम्ही याआधी कधी पाहिला नसेल, याची मला खात्री आहे. असं कॅप्शन तिने व्हिडीओ शेअर करताना दिलं आहे. एका युजरने कमेंट करत म्हटलं, रुग्णालयात माणसंही इतकं सहकार्य करत नाहीत. डॉक्टरांनी X - RAY मशीन जवळ नेल्यावर हा हत्ती त्यांच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करत होता. डॉक्टरांनीसुद्धा त्याला शाब्बासकी देत त्याच्या प्रतिसादाबद्दल कौतुक केलं आहे.