Lokmat Sakhi >Social Viral > वाराणसीच्या अस्सी घाटावर भीक मागून जगणारी महिला फाडफाड इंग्रजी बोलते तेव्हा.. व्हायरल व्हिडीओ..

वाराणसीच्या अस्सी घाटावर भीक मागून जगणारी महिला फाडफाड इंग्रजी बोलते तेव्हा.. व्हायरल व्हिडीओ..

बनारस विद्यापिठात शिकणाऱ्या अवनीश त्रिपाठी नावाच्या विद्यार्थ्याने केलेला व्हिडीओ. सध्या व्हायरल आहे, त्यात एक भिकारी महिला फाडफाड इंग्रजी बोलतेय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 04:41 PM2021-11-26T16:41:48+5:302021-11-26T17:21:37+5:30

बनारस विद्यापिठात शिकणाऱ्या अवनीश त्रिपाठी नावाच्या विद्यार्थ्याने केलेला व्हिडीओ. सध्या व्हायरल आहे, त्यात एक भिकारी महिला फाडफाड इंग्रजी बोलतेय..

When a woman living on Assi Ghat in Varanasi speaks English fluently ..See this viral video | वाराणसीच्या अस्सी घाटावर भीक मागून जगणारी महिला फाडफाड इंग्रजी बोलते तेव्हा.. व्हायरल व्हिडीओ..

वाराणसीच्या अस्सी घाटावर भीक मागून जगणारी महिला फाडफाड इंग्रजी बोलते तेव्हा.. व्हायरल व्हिडीओ..

Highlightsमूळची दक्षिण भारतातली स्वाती गेल्या तीन वर्षांपासून वाराणसीत अस्सी घाटावर जगते आहे.आपल्याला सन्मानानं जगण्याची, काम मिळण्याची गरज स्वाती व्यक्त करते.

शहरात आजूबाजूला फिरताना कितीतरी लोकं रस्त्याच्या कडेला बसलेली दिसतात. त्यांना जणू चेहराच नसतो, स्वत:ची ओळख नसते. लोकांच्या लेखी ही माणसं ( स्त्री, पुरुष, लहान मुलं-मुली सर्व) केवळ भिकारीच असतात. त्यांची दखल घ्यावी, विचारपूस करावी एवढा वेळ शहरातल्या माणसांकडे असतो कुठे? मग कशी कळणार या माणसांची गोष्ट. पण बनारस विद्यापिठात शिकणार्‍या अवनीश त्रिपाठी नावाच्या एका विद्यार्थ्याने केलेला एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे.  अस्सी घाटावर राहणारी एक भिकारी महिला उत्तम इंग्रजी बोलताना दिसते. ती महिला कोण, तिची अशी अवस्था का झाली याविषयी अनेकांना कुतूहल आहे.

Image: Google

 स्वाती म्हणजे ओळख नसलेली भिकारीच होती. वाराणसीच्या अस्सी घाटावर अवनीशनला ती कायम दिसायची. एकदा त्यानं तिच्याजवळ जाऊन तिची चौकशी केली तर ती त्याच्याशी थेट इंग्रजीतूनच बोलायला लागली. अवनीशलाही आधी आश्चर्य वाटलं. मग त्याने तिची खोलात चौकशी केली असता कळालं की हिचं नाव स्वाती आहे. मूळची दक्षिण भारतातली स्वाती गेल्या तीन वर्षांपासून वाराणसीला आली. तेव्हापासून आजतागायत तिचा मुक्काम अस्सी घाटावरच आहे. ती चांगली शिकलेली असून कम्प्युटर सायन्सची पदवीधारक आहे. मूल झाल्यानंतर तिच्या शरीराच्या उजव्या बाजूला अपंगत्त्व आलं. अस्सी घाटावर येणारी-जाणारी लोकं जे देतात त्यावर ती जगते आहे.

Image: Google

अवनीशला स्वातीची ही गोष्ट समजली तेव्हा त्याने तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करुन फेसबुकला टाकायचं ठरवलं. कारण स्वातीला असं भीक मागून, लोकांच्या दयेवर जगायचं नाहीये. तिला कम्प्युटरचं ज्ञान आहे, विविध सॉफ्टवेअरही तिला हाताळता येतात. एवढ्या गुणवत्तेवर तिला काम हवंय, पैसे कमवून तिला जगायचंय. अवनीशनं केलेल्या व्हिडीओमधे स्वाती स्वत:ची ओळख इंग्रजीतून देते तसेच कामासाठी कोणीतरी मदत करावी ही इच्छाही बोलून दाखवते. 

Image: Google

अवनीशनं हा व्हिडीओ फेसफुकवर पोस्ट केल्यानंतर तो व्हायरल झाला. अनेकांनी स्वातीच्या परिस्थितीविषयी हळहळ व्यक्त केली. एका डॉक्टरांनी तर स्वत:चा नंबर अवनीशला रिप्लाय म्हणून पाठवला आहे. या डॉक्टरांच्या मते आधी तिला वैद्यकीय उपचारांची गरज आहे. तर काहींनी आपल्याकडे कम्प्युटरशी निगडित काम आहे असं सांगून तिची मदत करण्याची तयारी दाखवली आहे.

 

Web Title: When a woman living on Assi Ghat in Varanasi speaks English fluently ..See this viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.