लहानपणापासून आपण डिस्ने लॅण्डच्या परीकथा ऐकत आणि पाहत आलो आहोत. डिस्ने लॅण्डचे चित्रपट आता पाहिल्यावर कळतं की, ते मुळात हसण्यासाठी नव्हतेच. त्यातील प्रत्येक गोष्ट काही ना काही बोध देणारी आहे. (Which cartoon do you like? Read About Disney Princess Syndrome )काही पात्रांचे संवाद तर मोठ्या-मोठ्या मोटिव्हेश स्पिकरला मागे टाकतील असे आहेत. डिस्ने लॅण्डच्या अनेक राजकुमारी आहेत. ज्यांची पात्रे प्रचंड गाजली. लहानपणी मी रुपांजल होणार किंवा मी सिंड्रेला होणार असं आपण म्हणायचो. पण तुम्हाला हे माहिती आहे का? त्या प्रत्येक पात्राने वेगवेगळा मानसिक आजार दर्शवला होता. 'कथा पोलइट' या अमेरिकन लेखिकेने डिस्नी प्रिंसेस सिंड्रोम या संकल्पनेची सुरवात केली होती. आता ही माहिती वाचून पुन्हा ते चित्रपट बघा. (Which cartoon do you like? Read About Disney Princess Syndrome )फरक लगेच जाणवून येईल. मुळात ज्या डिस्ने लॅण्ड पात्राशी तुम्ही स्वत:ची तुलना केली असेल, त्या पात्रा प्रमाणे तुम्ही ही त्या परिस्थितीतून जात असण्याची शक्यता आहे.
१.फ्रोझन मधील अॅना
डिस्ने लॅण्डचं सर्वांत लाडकं पात्र म्हणजे अॅना. तिला प्रचंड प्रेम मिळलं होतं. मिळत आहे. अॅनाने 'अॅटेंशन डेफीसीएट हायपरअॅक्टिव्हिटी डिसॉरडर'चे दर्शवला आहे. तिचे पात्र अस्थिर आणि अविचारी आहे. पण ती हळूहळू स्वभावात कसे बदल घडवते ते बघण्यासारखं आहे.
२.ब्यूटी अॅण्ड द बिस्ट मधील बेला
बेलाने स्टॉकहोम सिंड्रोम दर्शवला आहे. बेला तिच्या अपहरणकर्त्याच्याच प्रेमात पडते. असे या चित्रपटात बघायला मिळते. स्टॉकहोम सिंड्रोम मध्ये पिडिताला गुन्हेगार आवडायला लागतो. अति भीतीमुळे असे होते.
३.मुलान मधील मुलान
मुलान ने अटेलोफोबिया या आजाराची लक्षणे दाखवली आहेत. यामध्ये माणसाला स्वत:वरच विश्वास उरत नाही. सगळंच चूकीचं वाटायला लागतं. हा आजार बऱ्याच जणांमध्ये आढळून येतो. त्यामुळे मुलान प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांना तिचे पात्र रिलेटेबल वाटलं होतं.
इतरही सर्व पात्रे काही ना काही मानसिक आजार दर्शवणारी आहेत. या चित्रपटांचा असा विचार तुम्ही कधीच केला नसेल. सरते शेवटी त्या त्यांच्या मानसिक स्थितीत सुधार आणतात. हे ही शिकण्यासारखे आहे.