Lokmat Sakhi >Social Viral > White Clothes Cleaning Tips : पांढऱ्या कपड्यांवरचे हट्टी डाग निघतच नाहीत? 5 उपाय करा, न घासता कपडे होतील स्वच्छ

White Clothes Cleaning Tips : पांढऱ्या कपड्यांवरचे हट्टी डाग निघतच नाहीत? 5 उपाय करा, न घासता कपडे होतील स्वच्छ

White Clothes Cleaning Tips : जर तुमच्या पांढऱ्या पँटवर टोमॅटो, हळद आणि भाज्यांचे डाग पडले असतील तर बेकिंग सोडा हा उत्तम पर्याय आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 05:17 PM2022-04-22T17:17:08+5:302022-04-22T17:53:17+5:30

White Clothes Cleaning Tips : जर तुमच्या पांढऱ्या पँटवर टोमॅटो, हळद आणि भाज्यांचे डाग पडले असतील तर बेकिंग सोडा हा उत्तम पर्याय आहे.

White Clothes Cleaning Tips : How to clean stain on white clothes Effective Tips to Wash White Clothes at Home | White Clothes Cleaning Tips : पांढऱ्या कपड्यांवरचे हट्टी डाग निघतच नाहीत? 5 उपाय करा, न घासता कपडे होतील स्वच्छ

White Clothes Cleaning Tips : पांढऱ्या कपड्यांवरचे हट्टी डाग निघतच नाहीत? 5 उपाय करा, न घासता कपडे होतील स्वच्छ

बहुतेक लोकांना पांढरे कपडे घालायला आवडते. पण अनेकदा लोक डाग पडण्याच्या भीतीने पांढरी पँट किंवा शर्ट घालत नाहीत. कारण पांढऱ्या कपड्यांवर सहज डाग पडतात आणि त्यानंतर पुन्हा पांढरी पँट घालण्याचा विचार मनातून निघून जातो. असे बरेच लोक आहेत जे डाग पडल्यानंतर कधीही पॅंट वापरत नाहीत. ( How to clean stain on white clothes ) पण जर तुमच्याही कपड्यांवर कोणत्याही प्रकारचे डाग पडले असतील तर तुम्हाला ते फेकून देण्याची गरज नाही. कारण आज या लेखात आम्ही तुम्हाला पांढऱ्या कपड्यांवरील हट्टी डाग कसे काढायचे ते सांगणार आहोत. (Cleaning Tips and Hacks) घरात असलेल्या काही वस्तूंचा वापर करून हे डाग तुम्ही सहज काढू शकता. (Effective Tips to Wash White Clothes at Home)

1) बेकींग सोडा

जर तुमच्या पांढऱ्या कपड्यांवर डाग पडले असतील तर ते काढण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. जर तुमच्या पांढऱ्या पँटवर टोमॅटो, हळद आणि भाज्यांचे डाग पडले असतील तर बेकिंग सोडा हा उत्तम पर्याय आहे. जर हळदीचे डाग पडले असतील तर डाग असलेल्या जागेवर बेकिंग सोडा टाका आणि नंतर थोडे पाणी घालून चांगले चोळा. असे केल्याने हळदीचे डाग सहज निघून जातात.

२) अमोनिया

पांढर्‍या ड्रेस किंवा साडीवरील कोणतेही डाग काढून टाकण्यासाठी तुम्ही अमोनिया वापरू शकता. त्यामुळे डाग सहज निघून जातात. डाग असलेल्या भागावर फक्त अमोनिया घाला आणि सोडा. सुमारे 5-10 नंतर, चांगले घासून घ्या. अमोनियाचा वापर केल्याने  सर्वात हट्टी डाग देखील दूर होतील आणि तुम्ही पुन्हा पांढरी पँट घालू शकाल.

३) लिंबाचा रस

पांढऱ्या कपड्यांवरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता. लिंबू एक स्वच्छता एजंट मानले जातो. तुम्ही लिंबाचा रस कपडे स्वच्छ करण्यासाठी, म्हणजेच डाग काढून टाकण्यासाठी वापरू शकता. तुम्हाला फक्त लिंबू डाग लागलेल्या भागावर 3-5 मिनिटे घासायचे आहे. याने कोणत्याही प्रकारचे डाग सहज निघून जातील.

४) रबिंग अल्कोहोल

रबिंग अल्कोहोलचा वापर साफसफाईसाठी केला जातो. अशा स्थितीत, कोणत्याही प्रकारचे हट्टी डाग काढून टाकण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. आता तुम्हाला अल्कोहोल आणि लिंबाचा रस कपड्यांवर घासणे आवश्यक आहे. दोन्ही एकत्र करून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट डाग झालेल्या भागावर लावा. सुमारे 10 मिनिटे ठेवा. सुमारे 10 मिनिटांनंतर, ते ब्रशने किंवा हाताने घासून स्वच्छ करा.

५) हायड्रोजन पॅरोक्साईड

जर काही कारणास्तव तुमच्या पांढऱ्या शर्टवर डाग पडले असतील तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही हायड्रोजन पेरोक्साईडच्या मदतीने अगदी हट्टी डाग काढून टाकू शकता.  डाग काढण्यासाठी एका भांड्यात दोन चमचे हायड्रोजन पेरॉक्साइड गरम पाण्यात मिसळा. आता या मिश्रणात शर्टाचा डाग असलेला भाग थोडा वेळ भिजवा. सुमारे 10-15 मिनिटांनंतर, ब्रशच्या मदतीने डाग असलेली जागा चांगली घासून घ्या. तुम्हाला दिसेल की पांढऱ्या शर्टवरील डाग निघून गेला आहे.

कपड्यांवरचे हट्टी डाग काढताना या टिप्स लक्षात ठेवा

१) डाग काढण्यासाठी कोणतेही रासायनिक पदार्थ वापरू नका.

२) अस्वच्छ ठिकाणी कपडे धुवायला बसू नका

३) रंगीत कपड्यांसह पांढरे कपडे कधीच धुवू नका

४) पांढऱ्या कपड्यांवरचे डाग काढण्यासाठी ब्लीचचा वापर करू नका. यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.


 

Web Title: White Clothes Cleaning Tips : How to clean stain on white clothes Effective Tips to Wash White Clothes at Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.