Lokmat Sakhi >Social Viral > पांढरे कपडे धुवून - धुवून पिवळट पडले? एक भन्नाट ट्रिक - धुतल्याक्षणी कपडे दिसतील पांढरेशुभ्र

पांढरे कपडे धुवून - धुवून पिवळट पडले? एक भन्नाट ट्रिक - धुतल्याक्षणी कपडे दिसतील पांढरेशुभ्र

White Clothes Turned Yellow (Why and How To Fix It) पांढऱ्या कपड्यांचा रंग पिवळसर पडला असेल तर, धुताना एक पांढरी गोष्ट मिसळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2023 07:00 PM2023-08-23T19:00:16+5:302023-08-23T19:01:59+5:30

White Clothes Turned Yellow (Why and How To Fix It) पांढऱ्या कपड्यांचा रंग पिवळसर पडला असेल तर, धुताना एक पांढरी गोष्ट मिसळा

White Clothes Turned Yellow (Why and How To Fix It) | पांढरे कपडे धुवून - धुवून पिवळट पडले? एक भन्नाट ट्रिक - धुतल्याक्षणी कपडे दिसतील पांढरेशुभ्र

पांढरे कपडे धुवून - धुवून पिवळट पडले? एक भन्नाट ट्रिक - धुतल्याक्षणी कपडे दिसतील पांढरेशुभ्र

आपल्या आयुष्यात प्रत्येक रंगाला महत्व आहे. आयुष्यात रंग असेल तर, मन देखील प्रसन्न राहते. काहींना रंगी - बेरंगी कपडे परिधान करायला आवडते. तर काहींना सिंपल - सोबर कपडे घालायला आवडतात. खास प्रसंगी लोकं पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायला प्राधान्य देतात. परंतु, याच्या सततच्या वापरामुळे पांढरे कपडे पिवळट पडतात. यामुळे पांढऱ्या कपड्याची शोभा कमी होते.

पांढऱ्या कपड्यांची चमक आणि शुभ्रपणा कुठेतरी कमी होते. जे धुवून देखील निघत नाही. पांढऱ्या कपड्यावरील पिवळटपणा दूर करण्यासाठी, कपडे धुताना एक पांढऱ्या पावडरचा वापर करून पाहा. यामुळे मेहनत घेता, पांढरे कपडे नव्यासारखे चमकू लागतील(White Clothes Turned Yellow (Why and How To Fix It)).

कॉस्टिक सोडा

कॉस्टिक सोडाचे रासायनिक नाव सोडियम हायड्रॉक्साइड आहे. कास्टिक सोड्याचा वापर वस्तू स्वच्छ करण्यासाठी होतो. कास्टिक सोडा लिक्विड आणि सॉलिड या दोन्ही स्वरुपात उपलब्ध आहे. मात्र, याचा वापर केल्यामुळे स्किनला इजा पोहचू शकते, त्यामुळे याचा वापर करण्यापूर्वी हातात हातमोजे घाला, मगच याचा वापर करा.

नव्या झाडूतून घरभर भुसा पडतो? २ टिप्स, भुसा पडणे होईल बंद - कचरा कमी

कॉस्टिक सोड्याचा करा असा वापर

एका बादलीमध्ये पाणी घ्या. त्यात आवश्यकतेनुसार वॉशिंग पावडर मिसळा. नंतर त्यात दोन - तीन चमचे लाकडी काठीने कॉस्टिक सोडा घालून मिक्स करा. त्यानंतर या पाण्यात कपडे बुडवून दोन ते तीन तास भिजत ठेवा. नंतर कपडे सामान्य पद्धतीने धुवा. यामुळे काही मिनिटात कपडे नव्यासारखे चमकतील. व पांढऱ्या कपड्यांवरील पिवळट डाग निघून जातील.

कपड्यावर तेल सांडले? कपडे न धुता १५ मिनिटांत तेलकट डाग काढण्याची सोपी युक्ती

जर आपण पांढरे कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुवूत असाल तर, मशीनमध्ये डिटर्जंट पावडर आणि दोन ते तीन चमचे कॉस्टिक सोडा घालून मिक्स करा. मिक्स केल्यानंतर त्यात कपडे घालून नेहमीप्रमाणे धुवून घ्या. यामुळे कपड्यावरील पिवळट डाग निघून जाईल.

Web Title: White Clothes Turned Yellow (Why and How To Fix It)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.