तिचे व्हिडिओ व्हायरल होणं ही काही नवीन गोष्ट नाही. ती क्षणात ‘ती’ दिसते आणि काही मिनिटांत आपल्या नजरेसमोर तिचं रुप पालटतं. तुम्ही फक्त नाव घ्या ती काही क्षणात तशी दिसू लागेल. दीक्षिता जिंदाल तिचं नाव. ही तरुण मुलगी कधी क्षणात काजोल बनते, कधी शेरशहामधला सिद्धार्थ तर कधी आलिया भट. आता सध्या तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यात ती फटक्यात मेकअप करत झटक्यात शाहरुखचा पठाणचा चेहरामोहरा धारण करते.
अगदी सेम तशीच दिसते पठाण. एरव्ही महिलांचा चेहरा मेकअपने तयार करणं तरी सोपं पण दाढी, मिशा आणि केस आणि पठाणचा एकदम वेगळा लूक काही मिनिटांत मेकअपने करुन चेहरा बदलणं सोपं काम असेल का? अर्थात नाही. पण दीक्षिता जिंदालसाठी ते काम नाही पॅशन आहे. वेड आहे. तिच्या हातातली मेकअप कला अशी सुंदर आहे की ती क्षणात बहूरुपी होत रुप पालटते. तिचा व्हिडिओ पाहाच, बघा कशी ती चटचट सगळं करते.
कोण आहे ही दीक्षिता जिंदाल?
दीक्षिता जिंदाल तरुण मेकअप आर्टिस्ट आहे. मुळची दिल्लीची. तिनं इंजिनिअरिंग केलं. मात्र अकरावी बारावी असताना पासूनच तिला मेकअपचं वेड होतं. कम्प्यूटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग करत असतानाही मेकअपच्या रंगांचं वेड कमी झालं नाही. ऑनलाइन, युट्यूबवर पाहत पाहत ती मेकअप शिकली. हुदा कतान यांचे ब्लॉग आपण पाहत असू असं ती सांगतेच.
२०१७ पासून तिनं मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. २०१८मध्ये तिनं टिकटॉकने घेतलेली एक स्पर्धा जिंकली. त्यानंतर फेस आर्ट नावाची तिची सिरीजही खूप गाजली. आणि मग तिला नादच लागला म्हणता म्हणता मेकअपने ती ज्याचा हवा त्याचा चेहरा धारण करु लागली. शाहरुखच नव्हे तर आमिताभ बच्चन, रेखा, विराट कोहली, आलिया भट, काजोल, पंकज त्रिपाठी, अनुपम खेर, दिलिप जोशी अशा अनेक नामांकित कलाकारांची मेकअप कॉपी लूक साकारले आहेत.
तिचा ब्रायडल मेकओव्हर या विषयातही मोठा अभ्यास आहेत. आपल्या इन्स्टाग्रामपेजवर ती ते ही फोटो टाकत असते. मात्र आपल्या कामावर आणि कलेवर प्रेम असेल तर किती वेगळे प्रयोग करता येतात याचं उदाहरण आहे दीक्षिता जिंदाल. आता शाहरुखचा तिचा पठाण लूक पाहून लोक तिचे दिवाने झाले आहेत.