Lokmat Sakhi >Social Viral > १० वर्षांची लेक म्हणाली मला लग्न करायचंय, तिची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आईबाबांनी केलं धाडस

१० वर्षांची लेक म्हणाली मला लग्न करायचंय, तिची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आईबाबांनी केलं धाडस

Who is Emma Edwards? 10-year-old married as her last wish १० वर्षांची मुलगी, ब्लड कॅन्सर बरा होणार नव्हताच पण पालकांना म्हणाली माझी शेवटची इच्छा आहे मला नवरीसारखं सजायचंय, माझं लग्न व्हावं.. आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2023 06:09 PM2023-08-09T18:09:46+5:302023-08-09T18:10:55+5:30

Who is Emma Edwards? 10-year-old married as her last wish १० वर्षांची मुलगी, ब्लड कॅन्सर बरा होणार नव्हताच पण पालकांना म्हणाली माझी शेवटची इच्छा आहे मला नवरीसारखं सजायचंय, माझं लग्न व्हावं.. आणि..

Who is Emma Edwards? 10-year-old married as her last wish | १० वर्षांची लेक म्हणाली मला लग्न करायचंय, तिची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आईबाबांनी केलं धाडस

१० वर्षांची लेक म्हणाली मला लग्न करायचंय, तिची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आईबाबांनी केलं धाडस

जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए असं सांगून गेलेला बाबू मोशाय आनंद कधीच मरत नसतो. तशीच ही गोष्ट. डोळ्यात पाणी आणणारी. एका १० वर्षांच्या मुलीची. तिला ब्लड कॅन्सर झाला होता. आपण आता अगदी थोडे दिवस जगणार हे तिला तर कळून चुकलंच होतं पण तिच्या पालकांनाही कळलं होतं. पण जितके दिवस हातात आहे तितक्या दिवसात आपल्या मुलीच्या आयुष्यात आनंदी आठवणींचे रंग भरायचे असं पालकांनी ठरवलं.

लेकही म्हणाली, मरण्यापूर्वी मला नवरी व्हायचं आहे, लग्न करायचं आहे. बाहूलीचं लग्न लावण्याच्या वयात ही मुलगी आपलं लग्न करणार होती, तिनं तसं केलंही. तिच्या आनंदासाठी एक मुलगा आणि त्याचे आईबाबाही खाेट्या खोट्या लग्नाला तयार झाले. आणि त्या सोहळ्यानंतर १२ दिवसांनीच त्या छोटीनं जगाचा निरोप घेतला(Who is Emma Edwards? 10-year-old married as her last wish).

सिनेमात वाटावी अशी ही गोष्ट

अमेरिकेतल्या एम्मा एडवर्ड्सची ही गोष्ट. १० वर्षांची ही मुलगी. तिला लिम्फोब्लास्टिक ल्यूकेमिया (एएलएल) नावाचा आजार झाला होता. लिम्फोब्लास्टिक ल्यूकेमिया एक प्रकारचा ब्लड कॅन्सर आहे. जो सामान्यतः मुलांना होतो. एप्रिल २०२२मध्ये तिला कॅन्सर असल्याचे निदान झाले. थोडंच आयुष्य आलं आहे वाट्याला हे तिला आणि तिच्या पालकांना कळून चुकलं होतं.
एलिना एडवर्ड(एम्माची आई) सांगतात, ''माझी मुलगी नेहमी निरोगी दिसायची. एप्रिलमध्ये ती बेशुद्ध पडली. त्यावेळी तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. यात तिच्या पायांच्या हाडांमध्ये कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले.

She is the Barbie girl! १८,५०० बार्बी बाहुल्या जमवणाऱ्या बाईंची अजब वेडी गोष्ट

डॉक्टर म्हणाले, घाबरु नका उपचार केल्यानंतर मुलं बरी होतात. आम्हाला आशा होती, की एम्मा देखील बरी होईल, पण असे घडले नाही. जून २०२३मध्ये डॉक्टरांनी सांगितले की, एम्माचा कॅन्सर बरा होऊ शकणार नाही, तिच्याकडे जगण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत.’

पावसाळ्यात नळाला गढूळ पाणी येते? अस्वच्छ पाण्याने आंघोळ करू नका, ४ उपाय - पाणी होईल स्वच्छ

एम्माच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचं तिच्या पालकांनी ठरवलं. ती म्हणाली मला नवरी व्हायचं आहे. तर त्यांनी दोन दिवसात तयारी केली. अनेकांनी तिला भेटी दिल्या. १०० हून अधिक लोक लग्नाला आले. पण नवरा मुलगा. त्यांचे फॅमिली फ्रेण्ड असलेले एक कुटुंब. ते दोस्तीच्या नात्यानं तयार झाले. त्यांचा मुलगा डॅनियल. तो ही लहानसाच. त्याच्याशी खोटं खोटं लग्नही लावण्यात आलं. एमा मात्र खरी खरी नवरीसारखी सजली होती. त्यानंतर १२ दिवसांनीच एमाचं निधन झालं.

Web Title: Who is Emma Edwards? 10-year-old married as her last wish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.