२२ जानेवारी रोजी संपूर्ण भारत राममय वातावरणात तल्लीन झाला होता. कारण अयोध्येत (Ayodhya) प्रभू श्रीराम विराजमान झाले. रामललाची सुंदर-सुबक मूर्ती पाहताच अनेकांचे डोळे पाणावले. रामललाची ही मूर्ती ५ वर्षाच्या मुलाच्या रूपात बनवण्यात आली आहे, ज्यामध्ये रामललाचे बालस्वरूप दगडाच्या कमळावर बसलेले दाखवण्यात आले आहे. शिवाय मूर्तीवर भगवान विष्णूचे १० अवतार कोरण्यात आले आहे (Arun Yogiraj).
या मूर्तीचे कोरीव काम पाहण्यासारखे आहे. मुख्य म्हणजे कर्नाटकचे शिल्पकार अरुण योगीराज यांचे विशेष कौतुक होत आहे. पण योगीराज नक्की आहेत तरी कोण? सध्या त्यांची लव्हस्टोरी इतकी व्हायरल का होत आहे? योगीराज आणि विजेताची जोडी एखाद्या फिल्मी कपलसारखी असल्याचे बोलले जात आहे, त्यांच्यातलं बॉण्डिंग नेमके कसे आहे पाहूयात(Who is Vijetha wife of Ram Lalla idol sculptor Arun Yogiraj).
पत्नीने शेअर केली लव्हस्टोरी
कर्नाटकातील दिग्गज शिल्पकारांपैकी एक असलेले अरुण योगीराज सध्या चर्चेत आहेत. त्यांनी तयार केलेली रामललाची मूर्ती प्रत्येक भारतीयाला भावली. शिवाय त्यांच्या परिवाराचीही चर्चा सोशल मीडियात होत आहे. अरुण यांचे परिवार तसे लहान, याबद्दल योगीराज यांच्या पत्नी विजेता योगीराज यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल माहिती दिली.
दीपिका ते नयनतारा, सीतेची भूमिका साकारणाऱ्या पाहा ८ अभिनेत्री, स्मृती इराणी यांचीही भुमिका गाजली..
लाईफस्टाईलबद्दल दिली माहिती
WATCH: Vijetha Arun Yogiraj, wife of the sculptor Arun Yogiraj, shares her joy and pride as his idol of Lord Ram gets chosen for installation in #Ayodhya.
— The New Indian (@TheNewIndian_in) January 2, 2024
"I am extremely happy and proud, words can't express my joy. Initially, I was both happy and confused as my husband didn't… pic.twitter.com/rxgX4XEPiM
एका मुलाखतीत पत्नी विजेताला अरुणच्या लाईफस्टाईलबद्दल विचारले असता ती म्हणाली, 'अरुण एखाद्या अॅथलीटप्रमाणे रुटीन फॉलो करतो. जेव्हा तो कामाला लागतो तेव्हा तो सुमारे १० तास कामाला देतो. कधी कधी १० तासांपेक्षाही जास्त काम करतो.'
लव्हस्टोरी आहे हटके
विजेता योगीराज यांना त्यांच्या लग्नाबाबत प्रश्न विचारले असता विजेता म्हणाली, 'आमच्या लग्नाला १० ते १२ वर्ष झाली. आम्हाला २ मुले आहेत. आमच्या दोघांचे परिवार एकमेकांना फार पूर्वीपासून ओळखायचे. त्यामुळे आम्ही एकमेकांना भेटायचो. हळूहळू आमच्यात ओळख वाढत गेली. आमच्या नात्याची सुरुवात मैत्रीपासून झाली, आणि मग मैत्रीच रुपांतर लग्नात झाले.'
प्रेमासाठी किंमत मोजली पण स्वाभिमान नाही सोडला! सानिया मिर्झाच्या घटस्फोटाची चर्चा आणि..
मूर्ती तयार करताना खाल्ले 'सात्विक अन्न'
विजेता योगीराज यांनी सांगितले की, 'मूर्ती तयार करण्याच्या संपूर्ण कालावधीत अरुण यांनी सहा महिने फक्त 'सात्विक अन्न' खाल्ले. फळे आणि अंकुर असा मर्यादित आहार घेतला होता. त्यांच आपल्या कामाप्रती असलेले प्रेम विलक्षण आहे.'