Lokmat Sakhi >Social Viral > अंतराळात राहताना सुनिता विल्यम्सचे केस कायम मोकळे का होते? अंतराळवीर केस मोकळे सोडतात कारण..

अंतराळात राहताना सुनिता विल्यम्सचे केस कायम मोकळे का होते? अंतराळवीर केस मोकळे सोडतात कारण..

Astronauts hair in space: Why don't astronauts tie their hair: Microgravity hair behavior: Astronaut grooming in space: Sunita Williams hair in space: Space hygiene microgravity: ९ महिने केस न बांधता, न विचरता कुणी कसं राहू शकतं. यामागे नेमक कारण काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2025 11:26 IST2025-03-26T11:25:20+5:302025-03-26T11:26:02+5:30

Astronauts hair in space: Why don't astronauts tie their hair: Microgravity hair behavior: Astronaut grooming in space: Sunita Williams hair in space: Space hygiene microgravity: ९ महिने केस न बांधता, न विचरता कुणी कसं राहू शकतं. यामागे नेमक कारण काय?

why astronauts sunita Williams dont tie hair in space is there science behind know the exact reason | अंतराळात राहताना सुनिता विल्यम्सचे केस कायम मोकळे का होते? अंतराळवीर केस मोकळे सोडतात कारण..

अंतराळात राहताना सुनिता विल्यम्सचे केस कायम मोकळे का होते? अंतराळवीर केस मोकळे सोडतात कारण..

अंतराळात जवळपास ९ महिने घालवल्यानंतर भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर पृथ्वीवर परतले.(Astronauts hair in space) ५ जून २०२४ ला सुनिता विल्यम्स यांची अंतराळात मोहिम निघाली होती.(Microgravity hair behavior) त्यांच्या या मोहिमेने संपूर्ण देशाला आणि जगाला अभिमानाने भरून टाकले आहे. (Why don't astronauts tie their hair)
अंतराळातून परतल्यानंतर सुनिता विल्यम्सची चर्चा सर्वत्र होत आहे. लोकांच्या मनात सध्या एकच प्रश्न फिरत आहे ते म्हणजे तिच्या केसांविषयी.(Astronaut grooming in space) सुनिता विल्यम्स अंतराळात असताना तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या सर्व फोटोंमध्ये त्यांचे केस हे बांधलेले नव्हते. हे फोटो पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे की, ९ महिने केस न बांधता, न विचरता कुणी कसं राहू शकतं. यामागे नेमक कारण काय? (Space hygiene microgravity)

कबुतरांच्या विष्ठेच्या वासामुळे हैराण झालात? बाल्कनीत लावा 'हे' रोप, सोप्या टिप्स - घरही राहिल स्वच्छ

केस मोकळे ठेवण्याबाबत सुनिता विल्यम्स यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले. त्या म्हणतात की, केस सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात तरंगतात. जे पाहायला फार मजेशीर वाटते परंतु, तितकेच आरामदायक देखील आहे. यां कारणांमुळे मला नेहमीच केस मोकळे ठेवायला आवडायचे. 

अंतराळवीर अंतराळात केस उघडे का ठेवतात?

केस उघडे ठेवण्याचे मुख्य कारण म्हणजे सूक्ष्म गुरुत्वाकर्षण. पृथ्वीवर आपले केस गुरुत्वाकर्षणामुळे खाली राहतात. परंतु, अवकाशात गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे केस नेहमी हवेत तरंगत राहतात. अशावेळी कोणी केस बांधण्याचा प्रयत्न केला तरी ते सहजपणे बांधले जाणार नाही. 

सुनिता विल्यम्सचे आईबाबा कोण? कुठले? वाचा १० महत्वाच्या गोष्टी

अंतराळात केस न बांधण्याचे कारण 

1. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसते, त्यामुळे शरीरातील द्रव वरच्या दिशेने सरकतात. ज्यामुळे कधीकधी चेहऱ्यावर सूज येते आणि टाळूवर दाब येतो. या परिस्थितीत केस घट्ट बांधल्याने ही समस्या अधिक वाढू शकते. ज्यामुळे अंतराळवीरांना अस्वस्थता येते. टाळूवर ओढणे किंवा ताण जाणवू शकतो. अशा समस्या टाळण्यासाठी आणि टाळूमध्ये रक्ताभिसरण चांगले होण्यासाठी केस मोकळे ठेवणे फायदेशीर ठरु शकते. 

2. केस बांधल्यामुळे उष्णता आणि घामाची समस्या देखील वाढू शकते. अंतराळात आंघोळीसाठी पाणी नाही, म्हणून अंतराळवीर त्यांचे केस ड्राय शाम्पूने स्वच्छ करतात. केस मोकळे ठेवल्यास टाळूला पुरेशा प्रमाणात हवा मिळते. त्यामुळे घामाची समस्या फारशी होत नाही. 

 

Web Title: why astronauts sunita Williams dont tie hair in space is there science behind know the exact reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.