''गालावर खळी डोळ्यात धुंदी'', हे गाणं आपण ऐकलंच असेल. गालावरची खळी ही अनेकांना प्रचंड आवडते. खुदकन हसल्यावर ही खळी उठून दिसते. आवडत्या व्यक्तीची स्माईल जरी दिसली तरी संपूर्ण दिवस आनंदात जातो. बॉलीवूडमध्ये देखील असे काही कलाकार आहेत, ज्यांची खळी ही घायाळ करणारी ठरते.
ज्यात प्रीती झिंटा, शाहरुख खान, आलिया भट्ट, जॉन अब्राहम, अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे. पण गालावर खळी नक्की कशामुळे पडते? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? गालावर खळी पडण्याचं कारण काय? या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत(Why Do We Have Dimples? How they Form ).
करोडोंची मालकीण असलेली कंगणा ६०० रुपयांची साडी नेसते आणि म्हणते..
अनुवांशिक असते डिंपल
काही संशोधकांच्या मते, डिंपल अनुवांशिक असते. पहिल्या पिढीपासून पुढच्या पिढीला वारसाने मिळते. जर तुमच्या पालकांना डिंपल असतील तर तुम्हालाही डिंपल पडत असतील.
लहान स्नायू
दुसर्या थिअरीनुसार, लोकांच्या गालावर खळी तेव्हा पडते, जेव्हा एक मसल इतर मसल्सपेक्षा लहान असते. याकारणामुळे गालावर खळी पडते. गालावर असलेल्या या स्नायूला झिगोमॅटिकस म्हणतात, जर हा स्नायू मधूनच विभागला गेला किंवा लहान राहिला तर गालावर डिंपल्स दिसतात.
उन्हाळ्यात फ्रिजमधले गार पाणी प्यावे की आपला जुना माठच बरा? नक्की फायद्याचे काय...
डिंपल्स लहानपणी दिसतात, मोठे झाल्यावर अदृश्य होतात
काही लोकांना लहानपाणी डिंपल पडतात, परंतु वयाने मोठे झाल्यानंतर या डिंपल अदृश्य होतात. लहानपणी मुलांच्या गालावर बेबी फॅटमुळे डिंपल पडतात, पण जसजसे मुलं मोठे होतात, त्यावेळी गालावर असलेली बाळाची चरबी नाहीशी होऊ लागते, त्यामुळे डिंपल गायब होतात.
हनुवटीमध्ये पडते डिंपल
केवळ गालावरच नाही तर, काही लोकांच्या हनुवटीवरही डिंपल पडते. परंतु हनुवटीवरील डिंपल, अनुवांशिक किंवा स्नायूंचा दोष नसून, मातेच्या पोटात जेव्हा बाळ वाढते, तेव्हा त्याची हनुवटीवरील डावी व उजवीकडील हाडं एकत्र न जुळल्यामुळे ही खळी पडते.