स्वयंपाक करताना प्रेशर कुकरचा वापर बहुतांश घरांमध्ये अगदी रोजच केला जातो. वरण-भात करण्यासाठी तर कुकर लागतोच. पण त्याशिवाय वेगवेगळे पदार्थ शिजवण्यासाठीही कुकर हमखास वापरला जातो. पण ९० टक्क्यांपेक्षा जास्त महिला अशा आहेत की त्या अगदी रोजच्या रोज कुकर वापरतात, एवढंच नाही तर मागच्या कितीतरी वर्षांपासून रोज कुकर वापरतात, पण तरीही त्यांना कुकरचा स्फोट का होतो या मागची कारणं माहीत नसतात. तुम्हालाही याबाबतीत माहिती नसेल तर प्रेशर कुकरचा स्फोट होण्यामागची ही काही कारणं जाणून घ्या (5 tips for the safe use of pressure cooker) आणि प्रेशर कुकरचा सुरक्षित वापर करा.(Major Reasons Of Pressure Cooker Explode)
प्रेशर कुकरचा स्फोट का होऊ शकतो?
१. कुकरचा स्फोट होण्याच्या ज्या काही घटना आपण ऐकतो त्यापैकी बहुतांश घटनांमागे हे कारण असतं की कुकरचा वॉल्व्ह खराब झालेला असतो. कुकरच्या शिट्टीच्यावर एक सेफ्टी वॉल्व्ह असतो. अन्न शिजत असताना कुकरमध्ये जमा झालेली वाफ या वॉल्व्ह मधून बाहेर येत असते.
फक्त २९९ रुपयांत करा व्हॅलेंटाईन डे स्पेशल डेकोरेशन!! बघा कशी करायची स्वस्तात मस्त खरेदी
साधारण १० ते १२ महिन्यात हा वॉल्व्ह खराब होतो आणि तो बदलण्याची गरज असते. पण बहुतांश महिला वर्षानुवर्षे हा वॉल्व्ह बदलत नाहीत. त्यामुळे कुकर फुटण्यासारख्या किंवा त्याचा स्फोट होण्यासारख्या घटना घडतात.
२. जर तुम्ही कुकरमध्ये नेहमीच त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पदार्थ शिजवत असाल तरीही अशा घटना होऊ शकतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की कुकरच्या पाऊण भागापेक्षा तो कधीही जास्त भरू नये.
३. काही पदार्थ शिजविण्यासाठी खूप कमी पाणी टाकावं लागतं. खूपच कमी पाण्यात अन्नपदार्थ शिजवल्यामुळे कुकरमध्ये जो दाब तयार होतो, त्यामुळेही कुकर फुटू शकतो.
गरम पाणी पिऊनही पोट साफ होत नाही? ४ साध्या सोप्या टिप्स- ५ मिनिटांतच पोट साफ होईल
४. पदार्थ शिजवून झाल्यानंतर कुकरचं झाकण उघडण्याची खूप गडबड करणे, यामुळेही कुकरचा स्फोट होण्याचा धोका असतो.
५. कुकरच्या झाकणाची, झाकणाला असलेल्या रबराची आणि त्याच्या शिट्टीची जर व्यवस्थित स्वच्छता झाली नाही, तरीही कुकरचा स्फोट होऊ शकतो.