Lokmat Sakhi >Social Viral > टॉयलेटमध्ये सतत दुर्गंधी, कुबट घाणेरडा वास येतो? साफ करताना लक्षात ठेवा '१' गोष्ट

टॉयलेटमध्ये सतत दुर्गंधी, कुबट घाणेरडा वास येतो? साफ करताना लक्षात ठेवा '१' गोष्ट

Why Does My Toilet Smell Bad? Tips and Tricks : टॉयलेट स्वच्छ करणं कठीण काम वाटत असेल तर, साफ करताना ६ हॅक्सचा वापर करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2024 05:38 PM2024-06-07T17:38:02+5:302024-06-07T17:38:42+5:30

Why Does My Toilet Smell Bad? Tips and Tricks : टॉयलेट स्वच्छ करणं कठीण काम वाटत असेल तर, साफ करताना ६ हॅक्सचा वापर करा..

Why Does My Toilet Smell Bad? Tips and Tricks | टॉयलेटमध्ये सतत दुर्गंधी, कुबट घाणेरडा वास येतो? साफ करताना लक्षात ठेवा '१' गोष्ट

टॉयलेटमध्ये सतत दुर्गंधी, कुबट घाणेरडा वास येतो? साफ करताना लक्षात ठेवा '१' गोष्ट

घराची साफसफाई केल्यानंतर आपला मूड देखील साहजिक फ्रेश राहतो (Toilet Clean). पण घरात अस्वच्छता असली की मग, घरात कीटकांचा वावर वाढतो. लोक किचन, हॉल, बेडरूमची दररोज साफसफाई करतात (Cleaning Tips). पण टॉयलेटकडे दुर्लक्ष करतात (Bathroom Cleaning). काही लोक आठवड्यातून किंवा १५ दिवसातून एकदा टॉयलेट स्वच्छ करतात.

अस्वच्छ टॉयलेटमधून बऱ्याचदा सांडपाण्यासारखी दुर्गंधी येऊ लागते. त्यामुळे क्षणभरही घरात राहावेसे वाटत नाही. सांडपाण्याची दुर्गंधी येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. पण ही दुर्गंधी घालवण्यासाठी आपण घरगुती हॅक्सचा वापर करू शकता(Why Does My Toilet Smell Bad? Tips and Tricks).

बाथरुममधील सांडपाण्याची दुर्गंधी येण्यामागील मुख्य कारण..

अनेक वेळा लोक बाथरूममध्ये केस धुतात तेव्हा ते पाण्यासोबत पाईपमध्येही जाते. शॅम्पूच्या पिशव्या, टॉयलेट किंवा बाथरूममध्ये कोणताही कचरा, हे सर्व पाण्यासोबत पाइपलाइनमध्येही जाऊन अडकते. त्यामुळे तेथे घाण साचून दुर्गंधी येऊ लागते.

FSSAI म्हणते भेसळयुक्त कूकिंग ऑइल खाणं टाळा; गंभीर आजारांचा धोका वाढेल - सारखं आजारी पडाल

सांडपाणी साफ करण्यासाठी टिप्स

- बाथरूमच्या पाइपलाइनमधून घाण वास येत असेल किंवा कचरा अडकल्यामुळे पाणी साचत असेल तर त्यात कोमट पाणी घाला. यामुळे साचलेली घाण हळूहळू निघेल. सर्व जंतू आणि बॅक्टेरियाही नष्ट होतील.

- हवे असल्यास आपण कोमट पाण्यात व्हिनेगर देखील घालू शकता. हे पाणी बाथरूम आणि टॉयलेटच्या पाईपमध्ये टाकल्यास सर्व घाण निघून जाईल. शिवाय दुर्गंधीही कमी होईल.

- दुर्गंधी आल्यास, वॉशरूम आणि बाथरूममध्ये टॉयलेट एअर फ्रेशनर फवारणी करा. यामुळे टॉयलेट कायम सुगंधित राहील.

- अनेक वेळा शौचालयातील दुर्गंधी कमोडमधून नाही तर, गटारातूनही येते. कारण ज्या ठिकाणी पाणी येते त्या ठिकाणी घाण आणि कचरा साचतो. ड्रेनेजमधून पाणी येत नसेल तर तिथे शेवाळ, कचरा, केस वगैरे जमा झाले असावे. ज्यामुळे पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे कचरा सतत साफ करीत राहा.

मुलं स्वत:हून अभ्यासालाच बसत नाहीत? आईबाबा, करा फक्त ४ गोष्टी- न सांगता मुलं करतील अभ्यास

- टॉयलेट पॉटमधून घाणेरडा वास येत असेल तर त्यामध्ये टॅल्कम पावडर टाकू शकता. सकाळी टॉयलेट क्लिनरने कमोड पूर्णपणे स्वच्छ करा. यामुळे टॉयलेटमधून दुर्गंधी येणार नाही.

- अनेक वेळा कमोडला जोडलेली  फ्लश टाकी साफ न केल्यामुळे, त्यातून दुर्गंधी येते. अशा स्थितीत १५ दिवसांनी एकदा कमोडची टाकी स्वच्छ करा.

Web Title: Why Does My Toilet Smell Bad? Tips and Tricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.