Lokmat Sakhi >Social Viral > फ्रिजरमध्ये खूप बर्फ साचतो - पाणी गळतं? ३ सोपे उपाय; पैसे खर्च न करता प्रोब्लेम सुटेल

फ्रिजरमध्ये खूप बर्फ साचतो - पाणी गळतं? ३ सोपे उपाय; पैसे खर्च न करता प्रोब्लेम सुटेल

Why Is My Fridge Freezing up at the Back? Reasons, Easy Fixes : फ्रिजमधल्या बर्फाचं पाणी घरभर होत असेल तर; ३ सोपे उपाय करून पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2024 03:41 PM2024-09-19T15:41:05+5:302024-09-19T15:42:10+5:30

Why Is My Fridge Freezing up at the Back? Reasons, Easy Fixes : फ्रिजमधल्या बर्फाचं पाणी घरभर होत असेल तर; ३ सोपे उपाय करून पाहा

Why Is My Fridge Freezing up at the Back? Reasons, Easy Fixes | फ्रिजरमध्ये खूप बर्फ साचतो - पाणी गळतं? ३ सोपे उपाय; पैसे खर्च न करता प्रोब्लेम सुटेल

फ्रिजरमध्ये खूप बर्फ साचतो - पाणी गळतं? ३ सोपे उपाय; पैसे खर्च न करता प्रोब्लेम सुटेल

फ्रिजमध्ये पाणी थंड करण्यापासून ते भाज्या स्टोअर करुन ठेवण्यापर्यंत सगळं काही स्टोअर करता येतं (Cleaning Tips). फ्रिजचा वापर आपण दररोज करतो. पण याला नियमित साफ करायला आपल्याला जमेलच असे नाही (Freezing). दर आठवड्याला किंवा पंधरा दिवसांनी फ्रिज साफ करणं गरजेचं आहे. कारण आपण विविध पदार्थही स्टोअर करून ठेवतो. ज्यामुळे फ्रिजमध्ये बॅक्टेरिया पसरतात, आणि फ्रिज लवकर खराब होण्याचीही शक्यता असते.

बऱ्याचदा फ्रीजरमध्ये बर्फ साचतो. याला फ्रिजर फ्रॉस्ट होणे असेही म्हटले जाते. कधी चुकून हा साचलेला बर्फ काढण्यास उशीर झालाच, तर बर्फाचं पाणी घरभर होतं. जर आपल्याला सोप्या पद्धतीने साचलेला बर्फ काढायचा असेल तर, ३ टिप्स फॉलो करा. कमी वेळात बर्फ निघेल(Why Is My Fridge Freezing up at the Back? Reasons, Easy Fixes).

कोमट पाण्याचा वापर

फ्रीजरमध्ये जास्त बर्फ जमा झाला किंवा बर्फाचा डोंगर दिसू लागला तरीही काळजी करण्याची गरज नाही. यासाठी फ्रिजरच्या आकाराची बादली घ्या. त्यात कोमट पाणी घाला. ती बादली फ्रीजरमध्ये ठेवा, आणि दार लावा. काही मिनिटात बर्फ वितळेल.

तेलकट पदार्थ खाणे बंद करूनही वजन घटेना? ' हे ' ४ तेल स्वयंपाकासाठी वापरा, वजन वाढणारच नाही

जर छोटी बादली नसेल?

जर आपल्यलाकडे छोटी बादली नसेल तर, आपण कॉफी मगचाही वापर करू शकता. कॉफी मगमध्ये गरम किंवा कोमट पाणी भरून फ्रिजरमध्ये ठेवा. या युक्तीच्या मदतीने फ्रीजरमध्ये जमा झालेला बर्फ सहज वितळेल.

लाकडी चमच्याचा करा वापर

बऱ्याच वेळा रेफ्रिजरेटरमध्ये साठलेला बर्फाचा डोंगर गरम पाण्याच्या मदतीनेही सहज साफ होत नाही. यासाठी आपण लाकडी चमच्याचीही मदत घेऊ शकता. लाकडी चमच्याने बर्फ सहज निघेल. यासाठी विशेष मेहनत घेण्याची गरज नाही.

कपभर रवा आणि पाणी; पाहा कुरकुरीत मेदूवड्याची इन्स्टंट रेसिपी; अगदी १० मिनिटात नाश्ता रेडी

हेअर ड्रायर देखील ठरेल उपयुक्त

जर कोमट पाण्याने फ्रीजरमध्ये साचलेला बर्फ वितळत नसेल तर, आपण हेअर ड्रायरचीही मदत घेऊ शकता. यासाठी नॉर्मल स्पीडमध्ये हेअर ड्रायर चालू करा. आणि फ्रिजर जवळ ठेवा. हेअर ड्रायरच्या गरम वाफेमुळे काही मिनिटात बर्फ वितळेल. 

Web Title: Why Is My Fridge Freezing up at the Back? Reasons, Easy Fixes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.