Lokmat Sakhi >Social Viral > चिप्सच्या पाकिटात हवा का भरलेली असते? चिप्स कमी, हवा जास्त...

चिप्सच्या पाकिटात हवा का भरलेली असते? चिप्स कमी, हवा जास्त...

Why is there so much air in bags of potato chips? चिप्सच्या पाकिटात हवाच जास्त असते असे मिम व्हायरल होतात, पण खरंच त्या पाकिटात हवा का असते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2023 01:40 PM2023-05-04T13:40:43+5:302023-05-04T13:41:34+5:30

Why is there so much air in bags of potato chips? चिप्सच्या पाकिटात हवाच जास्त असते असे मिम व्हायरल होतात, पण खरंच त्या पाकिटात हवा का असते?

Why is there so much air in bags of potato chips? | चिप्सच्या पाकिटात हवा का भरलेली असते? चिप्स कमी, हवा जास्त...

चिप्सच्या पाकिटात हवा का भरलेली असते? चिप्स कमी, हवा जास्त...

चिप्सचं पॅकेट उघडलं की त्यात चिप्स कमी हवाच जास्त दिसते. अनेकदा त्याची टिंगल होते, लोक हसतात की आपण चिप्ससोबत हवा घेतो की हवेसोबत दोनचार चिप्स असेही टोमणे मारले असतात. पण खरंच कधी विचार केलाय की चिप्सच्या पाकिटात हवा का भरलेली असते?

पण यामागचे खरं कारण म्हणजे चिप्स तयार झाल्यानंतर प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी बऱ्याच दिवसांचा कालावधी लागू शकतो. या मधल्या वेळेत चिप्स खराब होऊ नये, व खाणाऱ्यालाही ते ताजे आणि क्रिस्पी मिळावेत, यासाठी पॅकेजिंग करतानाच पॅकेटमध्ये नायट्रोजन गॅस भरला जातो(Why is there so much air in bags of potato chips?).

त्याचं कारण काय?

१. चिप्सच्या पॅकेटमध्ये हवा भरण्यामागील कारण म्हणजे, चिप्स किंवा कुरकुरे नाजूक असतात. जर पॅकेटमध्ये हवा नसेल, तर ते एकमेकांशी आदळल्यानंतर तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे चिप्सच्या पॅकेटमध्ये हवा भरली जाते.

नव्या झाडूमधून फार भुसा पडतो, घरभर पसरतो? २ टिप्स, नवा झाडू घेतला की नक्की वापरा..

२. चिप्सच्या पॅकेटमध्ये हवा भरण्यामागे एक वैज्ञानिक सिद्धांत आहे. इटट्रिट या वेबसाईटनुसार, ऑक्सिजन हा अतिशय रिएक्टिव वायू मानला जातो. त्यामुळे पदार्थात जीवाणू वाढतात. त्यामुळे चिप्सच्या पॅकेटमध्ये नायट्रोजन वायू भरला जातो. नायट्रोजन हा ऑक्सिजनपेक्षा कमी रिएक्टिव वायू आहे. त्यामुळे हे पदार्थ अधिक काळ टिकतात.

३.चिप्सच्या पॅकेटमध्ये नायट्रोजन वायू असण्यामागे एक खास कारण आहे. नायट्रोजन वायू हा रंगहीन, गंधहीन असतो, व त्याला चव देखील नसते.  या सगळ्या बाबींचा विचार करूनच चिप्स व इतर खाद्यपदार्थांमध्ये नायट्रोजन गॅस भरली जाते. नायट्रोजन गॅस भरल्यामुळे आतील पदार्थ लवकर खराब होत नाही. यासह चिप्स जास्त काळ कुरकुरीत राहतात.

उन्हाळ्यात स्वयंपाक करताना किचनमध्ये उभे राहवत नाही? ५ टिप्स, किचन राहील थंड नेहमी

४. इटट्रिट या वेबसाईटनुसार, २५ रुपयांच्या चिप्स पॅकेटमध्ये ८५ टक्के नायट्रोजन असते. तर काही नामांकित चिप्सच्या पॅकेटमध्ये ७५ टक्के नायट्रोजन असते. हे प्रत्येक कंपन्यांच्या पॉलिसीनुसार बदलते.

Web Title: Why is there so much air in bags of potato chips?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.