संसाराचा गाडा नवरा - बायको मिळून हाकतात (Social Viral). एक चाक कोलमडले तर, अर्थात दुसरे चाक संपूर्ण भार सांभाळतो (Husband - Wife). पण जर सावरल्यानंतर गाडीच्या दुसऱ्या चाकानेच साथ सोडली तर? इथे गाडीची नाही तर? असाच एक प्रकार मलेशियात घडला.
नवरा गंभीर आजारी होता. बरेच महिने तो अंथरुणाला खिळून होता. बायकोने आपले कर्तव्य पूर्ण केले. तिने नवऱ्याची काळजी घेतली. नवरा बरा होईपर्यंत त्याची काळजी, घरसंसार सगळं सांभाळलं. पण शेवटी परतफेड म्हणून तिला काय मिळालं? नवऱ्याने बरं होताच १ आठवड्यानंतर दुसरं लग्न केलं. बायकोला काडीमोड दिला. ऐकून शॉक बसला ना, नक्की घडलं काय? पाहूयात(Wife cares for paralysed husband for six years. He divorces her and remarries after recovery).
ही दुर्दैवी कहाणी नुरुल सयाजवानी नावाच्या महिलेची आहे. नुरुलचं लग्न २०१६ साली झालं. त्यानंतर दोघे २ वर्ष लाँग डिस्टेनस मॅरेजवर होते. नंतर पतीचा मोठा कार अपघात झाला. अर्धांगवायूमुळे त्याला उठता - बसताही येत नव्हतं. तेव्हा बायकोने दिवसरात्र एक करत नवऱ्याची सेवा केली. ती सेवा करत असतानाचे व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर करत असे.
डायबिटिस आहे म्हणून साखरेऐवजी गूळ खाताय? शुगरच नाही डोक्याचा ताप आणि खर्चही वाढेल कारण..
पतीचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत तिने कॅप्शन दिले होते की, 'पतीला जेव्हा खोकला यायचा तेव्हा मला भीती वाटायची. कुटुंबातील सदस्य मला मदत करण्यासाठी यायचे. ज्यामुळे मला स्वतःसाठी थोडा वेळ मिळायचा.'
पत्नीच्या साथीमुळे आणि औषधोपचारामुळे त्याची तब्येत हळूहळू बरी होत गेली. मुलीला सांभाळून पतीला बरे करण्यासाठी ती धडपडत होती. मात्र, आजारातून बाहेर आल्यानंतर त्याने नुरुलला घटस्फोट दिला आणि आठवडाभरात दुसरं लग्नही केलं. हे घडल्यानंतर एखाद्या महिलेची पायाखालची जमीन सरकली असती. पण तिने पतीला माफ केलं आणि पतीविरुद्ध बोलण्याऱ्यांनाच खडेबोल सुनावले. फेसबुकच्या माध्यमातून पतीला त्याच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या.