Join us  

Wife Did Horror Prank : पती झोपेत असताना नकळत पत्नीनं असं काही केलं; डोळे उघताच भीतीनं उडाला थरकाप, पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2022 5:08 PM

Wife Did Horror Prank : हा व्हिडिओ इतका जबरदस्त आहे की त्याला आतापर्यंत 3 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

पती-पत्नीच्या नात्यात रागावणे, रूसणे फुगणे आणि आनंद साजरा करणे चालूच असते. कधीकधी पती-पत्नी एकमेकांच्या खोड्या काढत राहतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एवढा मजेशीर आहे, की पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येईल. पत्नीचे कृत्य पाहिल्यानंतर पतीचा भितीनं थरकाप उडालेला या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. (Wife was sleeping with her husband then got up in the night and did horror prank)

पती-पत्नीशी संबंधित या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पत्नी पतीसोबत झोपते. यानंतर, ती रात्री उठते आणि काहीतरी करते, ज्यामुळे तिचा पती खूप घाबरतो. तथापि, नंतर जे घडते ते खूपच मजेदार आहे.  पती चादर घालून आरामात झोपलेला आहे. मग अचानक बायको उठते. ती आपल्या पतीला घाबरवण्यासाठी स्टूलवर झोपण्याचा प्रयत्न करते. 

आपण पाहू शकता की सर्व प्रथम ती बेडच्या वर एक स्टूल ठेवते. यानंतर, ती हवेत लटकल्याप्रमाणे त्यावर झोपते आणि अंगावर चादर घेते. तुम्ही हॉरर सिनेमे पाहिले असतील तर त्यातही अशीच काही दृश्ये तुम्हाला पाहायला मिळतात. यानंतर ती पतीला हाताने स्पर्श करून उठवते. डोळे उघल्यानंतर पती इतका घाबरतो की तो बेडवरून खाली पडतो.

पाठवणीच्यावेळी नवरी राहीली बाजूला अन् नवराच रडायला लागला; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले.....

मात्र, काही वेळातच पत्नी चादर काढून खरं समोर आणते.  हा व्हिडिओ maquiagemmxl नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इतका जबरदस्त आहे की त्याला आतापर्यंत 3 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया