Join us  

विल स्मिथने भडकून कानाखाली वाजवली कारण पत्नीच्या आजाराची टिंगल, तो आजार नेमका कोणता? लक्षणं कोणती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2022 5:43 PM

Social Viral: जागतिक दर्जाच्या ऑस्कर सोहळ्यात (Oskar award) क्रिस रॉकला (Chris rock) बसलेल्या 'थप्पड की गुंज' आता  जगभरात ऐकली आणि चर्चिली जात आहे. या घटनेमागचा तो आजार नेमका आहे तरी काेणता?

ठळक मुद्देविल स्मिथची पत्नी जॅडा पिंकेट स्मिथ हिला नेमकं झालंय तरी काय, का बरं गळाले तिचे केस, केस गळण्याच्या संदर्भात असणारा तिचा हा आजार नेमका आहे तरी काय?

लॉस एंजेलस येथे सुरू असलेला ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा.. जगभरातल्या मिडियाचं त्याकडे असणारं लक्ष आणि पुरस्कार सोहळ्याला हजारो लोकांची असणारी प्रत्यक्ष उपस्थिती.. अशा या अतिउच्च दर्जाच्या पुरस्कार सोहळ्यात आपल्या पत्नीच्या शारिरीक व्यंगावर केला जाणारा विनोद आणि त्यावर उफाळलेले हास्य अभिनेता विल स्मिथ (Will Smith) याला अजिबात सहन झाले नाही. म्हणून त्याच आवेशात तो उठला आणि थेट जाऊन कार्यक्रमाचा सुत्रसंचालक तथा प्रसिद्ध अभिनेता क्रिस रॉक याच्या कानशिलात भडकावून आला. 

 

ही घटना जशी घडली तसे त्याचे जगभरात विविध पडसाद उमटत गेले. अनेक चर्चांना उधाण आले.. आणि या सगळ्या घटनेच्या तळाशी असणारा मुळ प्रश्न जाणून घेण्याची उत्सूकता अनेकांना छळू लागली. विल स्मिथची पत्नी जॅडा पिंकेट स्मिथ हिला नेमकं झालंय तरी काय, का बरं गळाले तिचे केस, केस गळण्याच्या संदर्भात असणारा तिचा हा आजार नेमका आहे तरी काय, कोणाला होऊ शकतो, काय त्याची लक्षणं.. अशा अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न नेटकरींकडून केला जात आहे.. म्हणूनच तर जॅडाला झालेल्या Alopecia Areata या आजाराविषयीची ही सविस्तर माहिती...

 

Alopecia या आजाराला आपण मराठीमध्ये चाई पडणे असे म्हणतो. या आजाराची जेव्हा सुरुवात असते तेव्हा डोक्याच्या काही भागावरचे केस गळायला सुरुवात होते आणि त्या भागावरचे केस पुर्णपणे गळून जातात. वेळीच उपचार केले नाहीत तर हा आजार वाढत जातो आणि केसगळती झपाट्याने होऊन जाते... मराठीमध्ये हा आजार इंद्रलुप्त या नावानेही ओळखला जातो. आयुर्वेद वाचस्पति वैद्य परीक्षित शेवडे यांनी याविषयीची एक पोस्ट नुकतीच फेसबुकला शेअर केली असून या आजाराची कारणे आणि लक्षणे याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. 

 

काय पडते चाई ?रोगप्रतिकारक शक्ती खूपच कमी असणे हे चाई पडण्याचं एक मुख्य कारण मानलं जातं. वेळीच योग्य उपचार मिळाले तर हा त्रास निश्चितच कमी होऊ शकतो. पण दुर्लक्ष केले तर मात्र हा आजार वाढत जातो आणि संपूर्ण डोक्याचेच केस गळण्याची भीती निर्माण होते.खाण्यापिण्याची काळी पथ्ये आणि तज्ज्ञांकडून घेतले जाणारे योग्य औषधोपचार यामुळे हा आजार पुर्णपणे बरा होऊ शकतो. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलऑस्करकेसांची काळजी