Lokmat Sakhi >Social Viral > पावसाळ्यात घराचे खिडक्या - दरवाजे फुगून झाले आहेत जाम ? ६ सोपे घरगुती उपाय...

पावसाळ्यात घराचे खिडक्या - दरवाजे फुगून झाले आहेत जाम ? ६ सोपे घरगुती उपाय...

The windows and doors of the house got jammed during the rainy season ? Follow these easy ways to fix : पावसाळयात बऱ्याच घरांमध्ये खिडक्या, दरवाजे आणि त्यांचे लॉकिंग सिस्टम जाम होऊन जातात अशा परिस्थितीत, करावेत असे काही सोपे उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2023 09:00 AM2023-07-25T09:00:30+5:302023-07-25T09:05:02+5:30

The windows and doors of the house got jammed during the rainy season ? Follow these easy ways to fix : पावसाळयात बऱ्याच घरांमध्ये खिडक्या, दरवाजे आणि त्यांचे लॉकिंग सिस्टम जाम होऊन जातात अशा परिस्थितीत, करावेत असे काही सोपे उपाय...

Windows and doors have become jammed in the rain, with these 6 methods, remove this problem in minutes, you will not be troubled again | पावसाळ्यात घराचे खिडक्या - दरवाजे फुगून झाले आहेत जाम ? ६ सोपे घरगुती उपाय...

पावसाळ्यात घराचे खिडक्या - दरवाजे फुगून झाले आहेत जाम ? ६ सोपे घरगुती उपाय...

पावसाळ्याचं वातावरण सगळ्यांनाच आवडते. पावसाळ्यात गरमागरम चहा, भजीचा आस्वाद घेणे, मस्त पावसात भिजणे, पावसाचा आनंद घेणे यासारख्या अनेक गोष्टी आपण पावसाळ्यात करतोच. परंतु हा पावसाळा सगळ्यांनाचं सारखा असतो असे नाही. अनेकांसाठी पावसाळा म्हणजे नकोशी वाटणारी आजारपणं, छताचं लिकेज, घरात साचणारं पाणीदेखील असू शकतं. पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने जवळपास सर्वच वस्तू खराब होऊ लागतात किंवा दुर्गंधी येऊ लागते. विशेष करुन पावसाळ्यात लाकडी वस्तू जसे की फर्निचर, कपाटं, दार, खिडक्या यांची योग्य ती काळजी घेतली नाही तर त्या खराब होतात. पावसाळ्यात लाकडी वस्तूंना वाळवी लागते किंवा काहीवेळा ओलाव्यामुळे या वस्तू फुगून खराब होऊ लागतात.    

पावसाळ्यात आपल्यापैकी काहींच्या घरी वाढलेल्या आर्द्रतेमुळे लाकडी दरवाजे, खिडक्या फुगतात आणि ते नीट लागत नाहीत. पावसाळ्यात दरवाजे, खिडक्या  फुगण्याचा त्रास तर प्रत्येकालाच कमी अधिक प्रमाणात सहन करावा लागतो. पावसाळ्यात, लाकडी दार - खिडक्यांनाही अनेकदा दुर्गंधी येऊ लागते किंवा बुरशीच्या खुणा दिसतात. काही वेळा हे लाकडू फुगून त्यातून तीव्र वास येतो. अशा परिस्थितीत पावसाळ्यात एकही लाकडी दरवाजा - खिडक्या खराब होऊ नये असे आपल्याला वाटत असेल काही उपाय करायला हवेत. काही घरगुती उपायांचा वापर करुन आपण लाकडी दारं - खिडक्या फुगण्यापासून त्यांचा बचाव करु शकतो(Windows and doors have become jammed in the rain, with these 6 methods, remove this problem in minutes, you will not be troubled again.) 

पावसाळ्यांत घरातील लाकडी दरवाजे - खिडक्या फुगू नये म्हणून उपाय... 

१. पावसाळ्यात, लाकडी दरवाजे कधी कधी फुगतात किंवा बुरशीच्या खुणा दिसतात. अशा स्थितीत, पावसाळ्यात लाकडी दरवाजा खराब होण्यापासून वाचवण्यासाठी आपण ऑयलिंग किंवा वॅक्सिंगचा वापर करु शकतात. त्यामुळे दरवाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्यापासून बचाव करता येतो. तेल लावण्यासाठी आपण ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. दार - खिडक्यांना तेल लावल्याने ते फुगून गच्च बसणार नाहीत.

२. लाकडी दरवाजे वेळच्यावेळी पॉलिश करून घेतले तर ते लवकर खराब होत नाहीत. यासाठी पावसाळा सुरू होताच घरातील दरवाजे आधीच पॉलिश करून घ्यावेत. ज्यामुळे दरवाज्याला लागलेली बुरशी, वाळवी किंवा छिद्रे नष्ट होतात. सहाजिकच यामुळे दरवाजे फुगत नाहीत आणि खराब देखील होत नाहीत.

किचन कॅबिनेट- ट्रॉल्यांची दारं तेलकट-चिकट झाली? २ सोपे उपाय, कॅबिनेट चमकेल नव्यासारखं...

३. साफसफाईचा ब्रश किंवा कापड पाण्यात भिजवून आपण दरवाजा, खिडकी इत्यादी वस्तू स्वच्छ करतो. जर आपण पावसाळ्यात अशी चूक केली तर दरवाजा खराब होऊ शकतो. जर आपल्याला पावसाळ्यातही लाकडी दरवाजा स्वच्छ करायचा असेल तर, ओल्या कपड्याने स्वच्छ करा. पाण्याऐवजी  कपडात इसेंशियल ऑईल घालून देखील स्वच्छ करू शकता. 

सतत पडणाऱ्या पावसामुळे गाडीच्या काचा, आरसे यातून धुरकट दिसते ? १ सोपा उपाय...

४. मेणबत्तीचा वापर करून आपण खिडक्या-दारांच्या घट्ट बसण्याची समस्याही दूर करू शकता. सर्वप्रथम मेणबत्ती चुरा. मग चुरलेली मेणबत्ती घट्ट झालेल्या कडीवर, लॉकिंग सिस्टमवर, दरवाजाचे हँडलमध्ये भरा आणि तीन चार वेळा उघडबंद करा. असे केल्यास जाम झालेल्या गोष्टी लगेच सैल होतील आणि सहज उघडतील.

पावसाळ्यात घरात सतत येणारा कुबट वास घालवण्यासाठी घरीच बनवा नैसर्गिक एअर फ्रेशनर...

वॉशिंग मशिनमधे धुतलेले कपडे एकमेकांत अडकतात, खूप सुरकुत्या पडतात? १ सोपी ट्रिक- बघा जादू...

५. अनेक वेळा दारे खिडक्या उघडल्यावर चर- चर आवाज येतात. तसेच अनेकदा कडी देखील खूप घट्ट होते. तेव्हा यावर मोहरीचे तेल उपयोगी ठरू शकते.  तेव्हा एका कोरड्या कपड्यावर मोहरीच्या तेलाचे काही थेंबी ओता. या कपड्याने लोखंडी कडी, दरवाजे आणि खिडक्या पुसा असे कल्याने  ते सहज उघडता येईल.

६. पावसाळ्यात अनेक वेळा लाकडी दरवाजे - खिडक्या फुगतात, त्यामुळे ते घट्ट होतात आणि सहज बंद होत नाहीत. तेव्हा घराचे दरवाजे आणि खिडक्या फुगल्या असतील तर त्यांना शक्यतो बंदच ठेवा. कारण उघडे ठेवल्याने ते आणखीन फुगण्याची शक्यता असते.

Web Title: Windows and doors have become jammed in the rain, with these 6 methods, remove this problem in minutes, you will not be troubled again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.