Join us  

She is the Barbie girl! १८,५०० बार्बी बाहुल्या जमवणाऱ्या बाईंची अजब वेडी गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2023 5:22 PM

Woman, 62, with 18,500 Barbie dolls holds Guinness World Record Title बाहुल्या आवडतात मुलींना पण मोठं झाल्यावर त्या मागे पडतात, एका जर्मन बाईंचं बार्बी प्रेम मात्र अफाट वेडं आहे.

''आ'एम बार्बी गर्ल इन दी बार्बी वर्ल्ड, लाईफ इन प्लास्टिक, इट्स फनटॅस्टिक'' नव्वदच्या दशकात रिलीज झालेलं हे गाणं आजही अनेक मुलींच्या जवळ आहे. जशी बार्बी ही बाहुली आहे. बाहुल्यांच्या विश्वात बार्बी डॉल फार फेमस आहे. अतिशय नाजूक, निरागस डोळे असलेली ही बाहुली आपल्याजवळ असावी, असं जगातल्या प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं.

नुकताच प्रदर्शित झालेला 'बार्बी' हा चित्रपट देखील तितकाच चर्चेत आहे. 'बार्बी'मुळे चित्रपटगृहातील वातावरण सध्या पिंकीमय झालं आहे. खरंतर अनेक किशोरवयीन मुलींची बार्बी ही सखी आहे. अहो, मुलीच सोडा, महिलांना देखील बार्बीचं वेड आहे. याचाच प्रत्येय जर्मनमध्ये आला आहे. एका महिलेकडे चक्क १८,५०० बार्बी डॉल्सचं कलेक्शन आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना? नक्की कोण आहे ती महिला? तिला बार्बीचं एवढं वेड का आहे? हे पाहूयात(Woman, 62, with 18,500 Barbie dolls holds Guinness World Record Title).

बार्बीची सुपरफॅन ६२ वर्षीय महिला आहे तरी कोण?

जर्मनस्थित बार्बी डॉलची सुपरफॅन, बेटीना डॉर्फमनकडे १८,५०० बार्बी बाहुल्यांचं कलेक्शन आहे. रुथ हँडलर या उद्योजिका-आईने आपल्या मुलीसाठी खास १९५९ साली बार्बी डॉलला जगात आणले. मॅटल कॉर्पोरेशन या कंपनीच्या माध्यमातून बार्बी अनेक मुलींची मैत्रीण झाली. जसा काळ उलटत गेला तसे बार्बीला डॉक्टर, टीचर, पायलट ही रूपे देण्यात आली.

१०१ वर्षांच्या आजीचा भार खांद्यावर वाहत कावड यात्रेला निघालेल्या नातवाची कमाल, २७० किलोमीटर पायी प्रवास

२००५ साली गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये बेटीनाच्या नावावर विक्रम नोंद करण्यात आला. तिने यात यूकेच्या टोनी मॅटियाला मागे टाकले होते. टोनी मॅटियाकडे १,१२५ बार्बी बाहुल्यांचे कलेक्शन होते, तर बेटीनाकडे २,५०० बाहुल्यांचे कलेक्शन होते. बेटीनाचे बार्बी कलेक्शन हळू हळू वाढत गेलं. व आज तिच्याकडे १८,५०० बाहुल्यांचे कलेक्शन आहे.

स्वयंपाकघरात फार झुरळं झाली? दुर्गंधीही येते? ३ सोपे उपाय- सिंक स्वच्छ आणि झुरळंही गायब

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

बेटीना पाच वर्षांची असताना तिला पहिली बाहुली मिळाली. बेटीना म्हणते, ''मला बार्बी डॉल्स खूप आवडतात. लहान असताना मी खूप खेळायची. ३० वर्ष झाले मी बार्बीचं कलेक्शन करत आली आहे. मी माझे करिअर बार्बी डॉल्सचे कलेक्शन आणि तिच्यावर पुस्तक लिहून बनवले आहे. माझे एक डॉल हॉस्पिटल देखील आहे. जिथे मी इतर बाहुल्या दुरुस्त करून देते.''

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरलमहिला