Join us  

रेल्वेच्या छतावर चढण्यासाठी महिलेची जीवघेणी धडपड, मात्र पोलीस येताच.... बघा व्हायरल व्हिडिओ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2022 12:14 PM

Viral Video: एका बांग्लादेशी महिलेचा (Woman from Bangladesh) हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.. त्यामुळे एकदा नक्की बघाच.

ठळक मुद्देएक दोन वेळा तर असंही झालेलं दिसत आहे की तिला आता वर चढता आलं, असं आपल्याला वाटत असतानाच नेमका तिचा पाय सटकतो

रेल्वे, बस यांना कायम गर्दी असते. सणासुदीचे किंवा सुट्यांचे दिवस असले की मग होणारी तोबा गर्दी बघूनच प्रवास रद्द करावा की काय असं वाटतं.. रेल्वेत चढण्यासाठी किंवा स्टेशन येताच उतरण्यासाठी सुरु असणारी अनेक जणांची जीवघेणी धडपड बघूनही जीव कासाविस होतो. असंच काहीसं या एका व्हिडिओमध्येही दिसत आहे. मुळचा बांग्लादेशचा असणारा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. इथे रेल्वेच्या छतावर चढण्यासाठी त्या महिलेची जी काही धडपड (Woman climbing to sit on the roof of train) सुरु आहे, ती खरोखरंच मोठी विनोदी आहे. (Viral video of Bangladesh railway station)

 

fresh_outta_stockz या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. बांग्लादेशमधील कोणतं तरी ते चांगलंच गर्दी असणारं एक स्टेशन आहे. यामध्ये जी रेल्वे दिसते आहे, तिच्या छतावर अनेक लोक बसलेले आहेत. त्या लोकांच्या डोक्यावरही एक छत दिसत आहे. त्यामुळे रेल्वेच्या छतावरही प्रवाशांना बसता येत असावं, असं वाटतं. या छतावर चढण्यासाठीच त्या महिलेची धडपड सुरु आहे. वर तिचे कोणीतरी नातलग बसलेले असावेत. ते तिला हात देऊन वर घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या बाईंना काही वर चढताच येत नाहीये.

 

रेल्वेच्या खिडकीवर पाय देऊन वर चढण्याचा ती जोरदार प्रयत्न करते आहे, पण तिला काही यश येईना.

देसी गर्लचे 'देसी मॉम' स्टाइल प्रेम, प्रियांकाच्या बाळाच्या पायात काळे मणी, नेटिझन्स म्हणाले....

एक दोन वेळा तर असंही झालेलं दिसत आहे की तिला आता वर चढता आलं, असं आपल्याला वाटत असतानाच नेमका तिचा पाय सटकतो आहे. एक- दोन ठिकाणांहून ती वर चढण्याचा प्रयत्न करतेय, पण तिला काही चढता येईना. शेवटी तिच्या मागून एक पोलिस येतात आणि तिला चांगलेच दटावतात. तेव्हा कुठे ती बाजूला होते. रेल्वेच्या छतावरही एवढ्या दाटीवाटीने लोक बसलेले आहेत, की त्यांच्या सुरक्षिततेची काय हमी, असा प्रश्न नक्कीच पडतो. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलमहिलारेल्वेबांगलादेश