खरा कलाकार जो असतो, त्याला कोणताही थाट- माट किंवा मोठा लवाजमा सोबत घेण्याची गरज नसते. अगदी मोजक्या साहित्यातूनही तो त्याच्या कलेचा सुंदर अविष्कार करू शकतो. चित्रकलेच्या बाबतीतही तेच. सहज उपलब्ध असणाऱ्या रंगीत पदार्थांचा वापर करूनही एखादा चित्रकार त्याची कला दाखवू शकतो. यासाठी त्याला खूप काही सोबत घेण्याची मुळीच गरज नसते. सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओतल्या तरुणीचीही तिच कथा. बघा कसं सुंदर चित्र तिने रेखाटलं आहे. (amazing painting by using just one white chalk)
@ValaAfshar या ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून It is hard to imagine that one can use chalk to draw this beautifully असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे.
सिझेरिअननंतरही उत्तम फिटनेस सांभाळणाऱ्या ७ अभिनेत्री; त्या सांगतात सिझरविषयीचे गैरसमजच जास्त कारण..
या व्हिडिओमध्ये दिसणारी तरुणी नेमकी कोणत्या देशातली याचा अंदाज येत नाहीये. पण तिने जे काही काढलं आहे, ते चित्र विलक्षण सुंदर आहे. विशेष म्हणजे फक्त १ पांढरा खडू वापरून तिने ते चित्र काढलं आहे आणि त्यात मोठ्या नजाकतीने शेडिंगही केलं आहे.
It is hard to imagine that one can use chalk to draw this beautifully pic.twitter.com/mAiPjyPCWV
— Vala Afshar (@ValaAfshar) November 3, 2022
छत्री घेऊन जाणारी एक पाठमोरी तरुणी आणि तिच्या पुढे काही अंतरावर असणारा एक पाठमोरा तरुण असं चित्र तिने काढलं आहे.
सुई- दोरा न वापरताही करता येईल सैलसर ब्लाऊजचं परफेक्ट फिटिंग! कसं? एक सोपी युक्ती
यामध्ये छत्री, तरुण आणि तरुणी यांचे जे आकार आहेत, तेवढे रिकामे ठेवून बाकी ठिकाणी तिने खडूने शेडिंग केले आहे. मुळातच खडू फिरवतानाच तो तिने अशा पद्धतीने फिरवला आहे की छत्री, तरुण आणि तरुणी यांची जागा रिकामी राहील. चित्र रेखाटताना तिची खडू फिरविण्याची पद्धत खरोखरंच लाजवाब असून बघण्यासारखीच आहे.