Lokmat Sakhi >Social Viral > सासूबाईंनी सुनेला मारली प्रेमाने मिठी, सूनबाईनेही केली कमाल.. नात्यातला गोडवा सांगणारा व्हायरल व्हिडिओ...

सासूबाईंनी सुनेला मारली प्रेमाने मिठी, सूनबाईनेही केली कमाल.. नात्यातला गोडवा सांगणारा व्हायरल व्हिडिओ...

Woman dances enthusiastically in front of her mother-in-law : Watch her reaction : एका सासू - सुनेचा एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2022 12:02 PM2022-12-30T12:02:56+5:302022-12-30T12:03:54+5:30

Woman dances enthusiastically in front of her mother-in-law : Watch her reaction : एका सासू - सुनेचा एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे.

Woman dances enthusiastically in front of her mother-in-law : Watch her reaction | सासूबाईंनी सुनेला मारली प्रेमाने मिठी, सूनबाईनेही केली कमाल.. नात्यातला गोडवा सांगणारा व्हायरल व्हिडिओ...

सासूबाईंनी सुनेला मारली प्रेमाने मिठी, सूनबाईनेही केली कमाल.. नात्यातला गोडवा सांगणारा व्हायरल व्हिडिओ...

सासू - सुनेचं नातं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येत ते फक्त वाद - विवाद, भांडण, राग- रुसवेफुगवे धरणारी एक जोडगोळी. जगात अजून न उलघडलेलं नातं म्हणजे सासू - सुनांचं नातं असं म्हटलं तर त्यात काही चुकीचे नाही. काळ कितीही बदलला तरी काही सासू-सुनांचे मात्र काही केल्या पटत नाही. सासु-सुनेच्या नात्यामध्ये दुरावा नेमका येतो तरी कसा हा फारच शोधाचा विषय आहे. अनेकदा या नात्यात इतका कडवटपणा येतो की, हे नाते एकमेकींना ओझे वाटू लागते. नात्यात अंतर जास्त वाढल्याने घरात नकारात्मकतेचे वातावरण तयार होते, ज्यामुळे केवळ सासू-सूनच नव्हे, तर घरातील अन्य व्यक्तीसुद्धा उदास राहू लागतात. घराचे वातावरण हसते - खेळते ठेवायचे असल्यास सासू - सून यांच्यातील नाते प्रेमाचे, आपुलकीचे आणि विश्वासाचे झाले पाहिजे. अशाच एका सासू - सुनेचा एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. या सासू - सुनेमधील नाते कसे आहे? सुनेने सासूसाठी काय केले ते या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू(Woman dances enthusiastically in front of her mother-in-law : Watch her reaction).    

नक्की या व्हिडिओमध्ये सुनेने काय केले ? 

या व्हिडिओमध्ये, एका घरात काही खास फंक्शन सुरु आहे. या फंक्शनदरम्यान घरातील सगळ्या स्त्रिया एकत्रित येऊन धमाल करताना दिसत आहे. ऊर्वी कार चौधरी हिने आपल्या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. ऊर्वी म्हणजेच या घरची सून हीने लाल रंगांची सुंदर साडी परिधान केली आहे. 'हम साथ - साथ है' या सुप्रसिद्ध हिंदी चित्रपटातील 'मय्या यशोदा' या गाण्यावर ती नाचताना दिसत आहे. ऊर्वी या कार्यक्रमांत दुसऱ्या - तिसऱ्या कोणासाठीही नाही तर चक्क आपल्या सासूसाठी नाचताना दिसत आहे. नाचता - नाचता ऊर्वी सासूचा आशीर्वाद घेण्यासाठी तिच्या पाया पडण्यासाठी गेली असता सासूने  तिला प्रेमाने जवळ घेऊन मिठी मारल्याचे दिसत आहे. आपल्या सुनेला आपल्यासाठी नाचताना बघून सासूच्या चेहेऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत आहे. 

कॅप्शनमध्ये काय लिहीलं आहे ? 

हा व्हिडीओ पोस्ट करताना ऊर्वीने त्या व्हिडिओला साजेशी अशी कॅप्शनपण दिली आहे. ऊर्वीने या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, "हा डान्स मी अचानक आयत्या वेळी सुचला तसा केला आहे. मी या डान्ससाठी कुठल्याही प्रकारची पूर्व तयारी केली नव्हती. मला आयत्यावेळी जशा स्टेप्स सुचल्या तशा मी केल्या आहेत. माझ्या मैत्रिणींनी अचानक हे गाणं लावल आणि मी त्या गाण्याच्या फ्लोमध्ये नाचायला सुरुवात केली. जेव्हा हा प्रसंग घडला तेव्हा तिथे उपस्थित सगळेच फार भावुक झाले होते".         

नेटकरी काय म्हणत आहेत ?

कोणत्याही प्रकारचे भांडण किंवा चीड - चीड न करणारी आणि सगळ्या पाहुण्यांसमोर चक्क सासूसाठी नाचणारी सून कोणत्या सासूला नाही आवडणार. अशा सुनेवर नेटकऱ्यांनी लाईक्सच्या स्वरूपात भरपूर प्रेम दाखविले आहे. हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर, ४. ४ मिलियन्स पेक्षा अधिक व्ह्यूज आणि २५०,००० पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. 'सासू - सुनेतील हा बॉन्ड बघून खूप आनंद झाला', अशी एका युजरने कमेंट केली आहे. 'प्रत्येक मुलाच स्वप्न असेल की त्याला अशी बायको मिळावी' , ' खूपच सुंदर नृत्य... जे बघून मन खुश झाले'  अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केल्या आहेत. इतर बऱ्याच नेटकऱ्यांनी हार्ट इमोजी देऊन या सुनेबद्दल प्रेम व्यक्त केले आहे.

Web Title: Woman dances enthusiastically in front of her mother-in-law : Watch her reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.