नृत्य (Dance) ही एक कला आहे. नृत्याचे विविध प्रकार आपण पहिलेच असतील. प्रत्येकाला प्रत्येक नृत्याचा प्रकार करता येईलच असे नाही. दैनंदिन सरावानंतरच उत्तम भाव, हाताची हालचाल व नृत्य सादर करायला जमते. सध्या अनेक डान्स फॉर्ममध्ये देखील बरेच अपडेटेड चेंजेस पाहायला मिळतात. काही नृत्य आकर्षक वाटतात तर, काही नृत्याचे प्रकार पाहून अनेक जण शॉक होतात.
असाच एक नृत्याचा प्रकार एका तरुणीने करून दाखवला आहे. ज्यात ती चक्क डोक्यावर सिलेंडर घेऊन नृत्य सादर करीत आहे. बरं हे नृत्य जमिनीवर नसून, तिने कळशीवर उभं राहून डान्स मुव्हमेंट करून दाखवला आहे. या तरुणीचं धाडस पाहून आपण देखील अवाक व्हाल. विश्वास बसत नाहीय ना? मग हा व्हिडिओ पाहाच(Woman dances with gas cylinder on her head, performs stunts).
तरुणीचं धाडसी नृत्य
आलियाने लेकीच्या केसांची केली खास हेअरस्टाईल! तशी फाऊंटन पोनी घालायची बघा खास पद्धत
व्हायरल व्हिडिओत तरुणीचा भन्नाट डान्स
तरुणीचं धाडसी व्हिडिओ करागम_दुर्गा या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तरुणी सहसतेने डोक्यावर सिलेंडर झेलून नृत्य करीत आहे. ते ही कळशीवर गोलगोल फिरून, हातावरील स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव हे लक्षवेधी ठरत आहे. हा नृत्य तिने एका दाक्षिणात्य गाण्यावर सादर केला आहे. हा नृत्य करण्यासाठी प्रचंड धाडस आणि सराव हवा, एवढं मात्र खरं.
इतकी रिस्क घेऊ नका!
लिफ्टमध्ये अडकून पडलात तर काय कराल? पॅनिक न होता झटपट करा ६ गोष्टी
हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखांच्या घरात व्हिव्ह्ज मिळाले असून, अनेकांनी तिच्या या धाडसेचं कौतुकही केलं आहे. व्हिडिओमधील स्टंटबाजी पाहून एकाने 'सुपर, परंतु सावधगिरीने हे नृत्य कर.' तर दुसऱ्याने, 'हा व्हिडिओ पाहून मला हार्ट अॅटॅक येईल' तर आणखी एका नेटकऱ्याने बहिणी एवढी रिस्क घेऊ नकोस.' अशा प्रकारच्या कमेंट करत नेटकऱ्यांनी तिची काळजीही दर्शवली आहे.