डान्स करणे हे काहींसाठी पॅशन असते तर काहींसाठी आवड. मग एखाद्या लग्नाच्या वरातीतला डान्स असो किंवा गणपतीच्या मिरवणूकीतला. अनेक जण डान्स म्हटले की भान हरपून नाचताना दिसतात. डान्सचे अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहत असतो. कधी एखाद्या लग्नातला नाचतानाचा व्हिडिओ असतो तर कधी आणखी काही. पण नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. तो पाहून आपल्याला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. त्याचे कारणही तसेच आहे. या व्हिडिओमध्ये महिला हातात पिस्तूल घेऊन नाचताना दिसत आहे (Woman Dances with Pistol in Hand Viral Video).
हा व्हिडिओ बिहारमधील असल्याचे बोलले जात असून तिने अशाप्रकारे हातात पिस्तूल का घेतली असावी याबाबत सोशल मीडियात चर्चा सुरू आहेत. लाल रंगाचा घागरा घातलेली ही तरुणी हातात पिस्तूल घेऊन स्टेजवर काही तरुणांसोबत डान्स करताना दिसत आहे. ही घटना बिहारमधील सिवान जिल्ह्यातील असल्याचे म्हटले जात आहे. यावरुन लोकांना आता कायद्याची भिती राहीलेली नाही असेच म्हणता येईल. अशाप्रकारे सार्वजनिकरित्या पिस्तूल बाळगणे हा कायद्याने गुन्हा असून या तरुणीला त्याबाबत कोणतीच भिती नसल्याचे तिच्या हालचालींवरुन दिसते. ती असे केवळ स्टंट म्हणून करते की तिचा दुसरा काही उद्देश असावा याबाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
ही घटना नेमकी सार्वजनिक कार्यक्रमातील आहे की कोणाच्या लग्नसमारंभातील याबाबत मात्र अद्याप काही समजू शकले नाही. मात्र पोलिस, कायदा यांसारख्या गोष्टींना या लोकांच्या लेखी काहीच किंमत नसल्याचे या व्हिडिओतून समोर येते. असे करताना जर एखादी व्यक्ती पकडली गेली तर त्याला २ वर्षे तुरुंगवास आणि दंड भरावा लागू शकतो. मात्र इथे खुलेआम ही तरुणी पिस्तूल हातात घेऊन नाचताना तिला पोलिसांनी पकडले की नाही याबाबत मात्र काही समजू शकले नाही.