Join us  

महिलेनं केला डान्स, तिच्यासोबत पिंजऱ्यातल्या प्राण्यानेही धरला ठेका, पाहा व्हायरल व्हिडिओ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2022 2:07 PM

Woman Dances With Raccoon at the Zoo Viral Video : महिलेचे पाहून प्राणी इतका हुबेहूब डान्स करत आहे की ...

ठळक मुद्देबाकी काहीही असो पण रकून आणि महिलेचा हा डान्स करतानाचा व्हिड़िओ खूपच क्यूट आहे यात वाद नाही. जंगलामध्ये हा प्राणी ३ वर्षांहून अधिक वर्ष जगत नाही. मात्र या प्राण्याला संग्रहालयात कैद केले तर त्याचे आयुष्य २० वर्षे होते.

आपल्या घरात एखादा कुत्रा किंवा पोपट असेल तर तो घरातला सगळ्यांचा लाडका असतो. एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्याला जपताना या प्राण्याला किंवा पक्ष्याला आपण आपली भाषाही शिकवतो. हळूहळू तो आपली भाषा बोलायला लागतो, इतकेच नाही तर आपल्यासारख्या हालचालीही करतो. आता घरात पाळलेल्या प्राण्यानी असे काही केले तर ठिक आहे. पण झूमध्ये पिंजऱ्यात असलेल्या एखाद्या प्राण्याने असे काही केले तर आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटू शकते. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक प्राणी अशीच एका महिलेची नक्कल करताना दिसत आहे (Viral Video). हा प्राणी महिलेचे पाहून इतका हुबेहूब डान्स करत आहे की आपल्याला पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही (Woman Dances With Raccoon at the Zoo). 

(Image : Google)

प्राण्यांवर प्रेम असणाऱ्यांसाठी तर हा व्हिडिओ म्हणजे एक मस्त मेजवानीच आहे असे म्हणायला हरकत नाही. व्हिडिओच्या सुरुवातीला रकून नावाचा एक प्राणी व्हिडिओमध्ये पिंजऱ्यात दिसतो. तर पिंजऱ्याच्या बाहेर काळ्या कपड्यातील एक महिला आपल्याला दिसते. काही वेळातच ही महिला डान्सच्या काही स्टेप्स करताना दिसते. तर पिंजऱ्यामध्ये महिलेच्या मागच्या बाजूला पिंजऱ्यात स्टूलवर उभा असलेला रकून अगदी हुबेहूब तिच्यासारख्याच अॅक्शन करताना दिसतो. व्हिडिओमध्ये दोघांची जुगलबंदी अगदी पाहण्यासारखी आहे. हा रकून आपल्यासारख्या अॅक्शन करत असल्याने महिला काहीशी खूश झालेली आणि हसतानाही व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

ट्विटरवर शेअर कऱण्यात आलेला हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नेटीझन्स कौतुकाने हा व्हिडिओ पाहत आहेत. रकून हा प्राणी साधारणपणे अमेरिकेत आढळणारा प्राणी आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटले आहे की, जंगलामध्ये हा प्राणी ३ वर्षांहून अधिक वर्ष जगत नाही. मात्र या प्राण्याला संग्रहालयात कैद केले तर त्याचे आयुष्य २० वर्षे होते. हे सगळे ठिक असले तरी अशाप्रकारे प्राण्यांना कैद करणे कितपत योग्य आहे हा प्रश्न बाकी राहतोच. रकून माणसांना घाबरत नाही, त्यामुळे तो माणसांच्या घरात घुसून त्यांचे अन्नही खाऊ शकतो असेही या कॅप्शनमध्ये पुढे म्हटले आहे. बाकी काहीही असो पण रकून आणि महिलेचा हा डान्स करतानाचा व्हिड़िओ खूपच क्यूट आहे यात वाद नाही. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियानृत्य