दुचाकी असो किंवा चारचाकी असो. त्यांचे रंग, आकार ठरलेले असतात. आपल्याला त्यात फार काही बदल करता येत नाही. त्यामध्ये आपल्याला करता येण्यासाठी एकच गोष्ट असते ती म्हणजे गाडीचा रंग आपल्या आवडीचा घेणे, त्याला सीटकव्हर आपल्या आवडीच्या रंगाचे घालणे. या व्यतिरिक्त आपण गाडीच्या सजावटीसाठी फार काही वेगळं करू शकत नाही. असं तुम्हालाही वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात. कारण आपल्या नेहमीच्याच दुचाकीवर भन्नाट कलाकुसर करून एका महिलेने तिच्या टु- व्हिलरचं रूप पुर्णपणे बदलून टाकलं आहे. तिचा तो व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. (woman decorate her two wheeler with pearl, kundan and gave it designer look)
hetal_diy_queen या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्या गुजरात येथील जुनागडच्या राहणाऱ्या असून कलाकुसरीच्या क्षेत्रातच त्या काम करतात, असं त्यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरून दिसून येतं.
डाएटमध्ये करा ५ साधे- सोपे बदल, भराभर वजन कमी होईल- वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला
त्यांच्याकडे काळ्या रंगाची एक दुचाकी आहे. या गाडीला थोडा वेगळा, डिझायनर लूक देण्याचं त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी काम सुरू केलं.
गाडीचा जो बाह्य भाग आहे, तो त्यांनी पुर्णपणे मोती आणि वेगवेगळ्या रंगाचे मणी आणि कुंदन लावून सजवून टाकला आहे. कलाकुसरीचं हे काम त्यांनी एवढं आकर्षक पद्धतीने केलं आहे की त्या गाडीचं पूर्ण रूपच बदलून गेलं आहे.
उन्हाळ्यात करून खायलाच पाहिजे कैरीचं आंबट- गोड वरण, बघा कैरीच्या आमटीच्या २ खास रेसिपी
ती गाडी कोणती होती, हे आता ओळखू येत नाही. तुम्हालाही तुमच्या गाडीचा रंग, रुप आवडत नसेल आणि तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर तुम्हीही तुमच्या गाडीचा लूक अशा पद्धतीने बदलून टाकू शकता. हा व्हिडिओ सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल झाला असून त्याला आतापर्यंत १२ लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.