Join us  

Woman distributes leftover food : माणुसकीला सलाम! भावाच्या लग्नाचं उरलेलं जेवणं तिनं गरीबांना वाटलं; 'त्या' फोटोनं नेटिझन्सचं मन जिंकलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2021 4:44 PM

Woman distributes leftover food : एका रेल्वे प्लॅटफॉर्मवर ती मोठमोठी जेवणाची भांडी घेऊन कागदी ताटांवर गरजूंना आनंदाने अन्न वाटप करत आहे.

लग्नसराई सुरू झालीये. सोशल मीडियावर कपल्सचे वेडींग शूट, प्रिवेडींग शूट तुफान व्हायरल होत असून लोक खास प्रसंगासाठी सज्ज आहेत. सध्या सोशल मीडियावर एक माणुसकीचं दर्शन घडवणारा एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल लग्नासारख्या मोठ्या प्रसंगात जेवण मोठ्या प्रमाणावर वाया जातं. (Bengal woman distributes leftover food from brothers wedding to needy)

हॉलमध्ये पाहुणे मंडळी जेवून गेल्यानंतर उरलेलं जेवण काय केलं हे अनेकदा लग्नघरातील मंडळींकडून विचारलं जात नाही.  सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या महिलेनं आपल्या भावाच्या लग्नात  उरलेलं जेवण  गोरगरिबांमध्ये जाऊन वाटलं आहे. 

पारंपारीक पोषाखात नटून थटून जेवण वाढणारी ही महिला पश्चिम बंगालची रहिवासी आहे. पश्चिम बंगालच्या  एका रेल्वे प्लॅटफॉर्मवर ती मोठमोठी जेवणाची भांडी घेऊन कागदी ताटांवर गरजूंना आनंदाने अन्न वाटप करत आहे. राणाघाट स्टेशनवर पहाटे 1 वाजताच्या सुमारास वेडिंग फोटोग्राफर नीलांजन मंडल यांनी हा हृदयस्पर्शी क्षण टिपला.

या महिलेची ओळख पपिया कार अशी आहे. फोटोग्राफर नीलांजन मंडलने सांगितले की त्या दिवशी तिच्या भावाच्या लग्नाचे रिसेप्शन होते आणि भरपूर अन्न शिल्लक होते. हे अन्न गरजूंपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तिने स्वत:वर घेतली. वयोवृद्ध महिलांपासून लहान मुलांपर्यंत, रिक्षावाले आणि बरेच लोक तिच्याजवळ मस्तपैकी जेवण घेण्यासाठी जमलेले दिसले. जरी मंडलने फेसबुक वेडिंग फोटोग्राफर्सच्या ग्रुपमध्ये काही फोटो शेअर केले असले तरी सध्या हे फोटो सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. 

बापरे! हेअर डायमुळे महिलेची अशी काही दशा झाली; पाहाल तर कलर करण्याआधी १० वेळा विचार कराल

या महिलेचे फोटो पाहणाऱ्या अनेक स्थानिकांनी सांगितले की ही काही वेगळी घटना नाही. ती परिसरातील गरजूंना अन्न पुरवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेते. अशा मोठ्या समारंभात अन्नाची नासाडी रोखल्याबद्दल अनेकांनी तिचे कौतुक केले, तर अनेकांनी आशा व्यक्त केली, की तिची ही दयाळू कृती इतरांनाही असे करण्यास प्रेरित करेल. आतापर्यंत ८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी  या फोटोवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलपश्चिम बंगालप्रेरणादायक गोष्टी