Join us  

सलाम! २ लेकरांना सोबत घेऊन फुड डिलिव्हरीसाठी पायपीट करतेय माऊली; इमोशनल-अस्वस्थ करणारा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 12:38 PM

Woman does food delivery with her two children video : इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ स्वत: जेवण ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीने रेकॉर्ड केल्याचे सांगितले जात आहे.

इंटरनेटच्या जगात सध्या सोशडियावर फूड डिलिव्हरी एजंटचे व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावरील प्रत्येकाला घरोघरी अन्न पोहोचवणाऱ्या या लोकांच्या कथा जाणून घ्यायच्या आहेत. नुकताच झोमॅटोची डिलिव्हरी करणाऱ्या महिलेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ पाहून लोक त्या महिलेला सलाम करत आहेत. वास्तविक, या व्हिडिओमध्ये एक महिला तिच्या दोन मुलांसोबत फुड डिलिव्हरी करताना  आहे. हा व्हिडिओ प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारा आहे. (Woman does food delivery with her two children video viral on social media)

इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ स्वत: जेवण ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीने रेकॉर्ड केल्याचे सांगितले जात आहे. महिलेसोबतची दोन मुले पाहून जेवण मागवणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, दोन मुलांना घेऊ फुड डिलिव्हरी करणं खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही खूप छान काम करत आहात.  या महिलेनं तिच्या पाठीवर झोमॅटोची बॅग लावली आहे आणि एका निष्पाप मुलीला तिच्या मांडीवर घेऊन आहे.

असे सांगितले जात आहे की महिला तिच्या दोन मुलांना कामावर जाताना सोबत घेऊन जाते. व्हिडिओमध्ये महिलेने एका मुलाला आपल्या मांडीवर धरले आहे आणि दुसरे मूल तिचे बोट धरून उभे आहे. नुकताच असाच एका दिव्यांग फूड डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता, ज्याचे कौतुक करताना  लोक थकत नव्हते. त्याचवेळी या सीक्वेन्समध्ये या महिलेचा व्हिडिओ लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करत आहे.

बिकिनीत फिरणाऱ्या तरुणींमध्ये अचानक आली साडी नसलेली बाई , पाहा व्हायरल रिॲक्शन

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला लोक खूप पसंत करत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत ९० हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला पाच हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स महिलेचे कौतुक करताना थकत नाहीत.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाप्रेरणादायक गोष्टी