Join us  

स्काय डायव्हिंग करताना तिने चक्क चॉकलेट केक खाल्ला? व्हायरल व्हिडिओ पाहून नेटिझन्स खरोखर झाले चकित..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2022 1:30 PM

Woman Enjoying Pie While Skydiving Viral Video : हजारो फूट उंचीवर आपल्या आवडीची ही डीश स्काय डायव्हिंग करताना खाणाऱ्या तरुणीच्या धाडसाचे कौतुकच...

ठळक मुद्देहा व्हिडिओ जवळपास ८ लाख जणांनी लाइक केला असून २३ लाख जणांनी तो आतापर्यंत पाहिला आहे. हजारो फूट उंचीवर आपल्या आवडीची ही डीश स्काय डायव्हिंग करताना खात आहे. 

स्काय डायव्हिंग  आपल्याला ऐकून किंवा व्हिडिओ पाहून माहित असतं. पण आपल्याला ते करायला सांगितलं तर मात्र आपण ४ पावलं मागेच येऊ. अगदीच कोणी खूप आग्रह केला किंवा आपल्या बकेट लिस्टपैकी एक असेल तर आपण कदाचित हे करायचा ट्राय करु. पण तेव्हाही कदाचित भितीने आपण डोळे मिटू किंवा देवाचा धावा करु. स्काय डायव्हिंग करताना मजा वाटत असली तरी प्रत्यक्ष उडी मारायची वेळ येते तेव्हा मात्र आपले धाबे पुरते दणाणलेले असते. अनेकांना हे करताना ब्रम्हांड आठवते आणि पोटात गोळा येऊन भयंकर भिती वाटते. स्काय डायव्हिंगसाठी उडी मारताना व्यायाम करणारी तरुणी तर कधी नवऱ्याने जबरदस्ती हे साहस करायला लावले म्हणून डायव्हिंग करताना नवऱ्याला शिव्या देणाऱ्या तरुणींचे व्हायरल व्हिडिओ आपण याआधीही पाहिले असतील (Woman Enjoying Pie While Skydiving Viral Video). 

नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये स्काय डायव्हिंग करणारी तरुणी घाबरली नसून ती अतिशय आनंदात असल्याचे दिसत आहे. इतकेच नाही तर आकाशात असताना ती चक्क हातातल्या बॉक्समध्ये असलेला केक खाताना दिसते. तिच्या हातात असलेला बॉक्स ती उघडते आणि दुसरा हात या केकमध्ये घालून मुठीनेच पटकन केक तोंडात कोंबते. हे करताना तिचा हात, तोंड सगळे भरते. मात्र तिला त्याचे काहीच वाटत नाही आणि ती त्या मोमेंटचा आनंद घेताना दिसते. त्यामुळे ही तरुणी खाण्याची नक्कीच शौकीन असणार हे वेगळं सांगायला नको. त्यामुळेच ती हजारो फूट उंचीवर आपल्या आवडीची ही डीश स्काय डायव्हिंग करताना खात आहे. 

सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या धुमाकूळ घालत असून इन्स्टाग्रामवर तो शेअर केल्यानंतर लाखो लोकांनी तो पाहिला आहे. इतकेच नाही तर अनेकांनी हा व्हिडिओ पाहून आश्चर्यही व्यक्त केले आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तरुणीने पांढरा टिशर्ट, निळी पँट आणि डोळ्यावर गॉगल लावलेला दिसत आहे. ही तरुणी परदेशी असल्याने हा व्हिडिओ भारतातील नसावा असे वाटते. मात्र तो नेमका कुठला आणि कधीचा आहे याबाबात मात्र माहिती मिळू शकलेली नाही. हा व्हिडिओ जवळपास ८ लाख जणांनी लाइक केला असून २३ लाख जणांनी तो आतापर्यंत पाहिला आहे. हा पाय केक आकाशात कुठून आला, अशाप्रकारे केकचा आनंद घेणे ही किती छान गोष्ट आहे, तर असे करण्यात काही तथ्य नाही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया यावर आल्या आहेत.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया