Viral News : हॉटेल रूम्समधील गुप्त कॅमेरांच्या घटनांची नेहमीच चर्चा होत असते. अनेक हॉटेल्सच्या रूममध्ये अशाप्रकारचे गुप्त कॅमेरे लावले जातात आणि गेस्टचे खाजगी क्षण रेकॉर्ड केले जातात. नंतर हे व्हिडीओ विकले जातात किंवा सोशल मीडियावर शेअर केले जातात. खासकरून महिलांसोबत अशा अनेक घटना घडतात. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्यांचं जगणं मुश्कील होऊन जातं. मात्र, या समस्येला मात देण्यासाठी एका महिलेनं जबरदस्त जुगाड शोधून काढला. (Woman safety tip for hidden camera in hotel) या महिलेनं केलेला जुगाड फॉलो करून इतरही महिला स्वत:ला सुरक्षित ठेवू शकतात.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, डॅंग नावाची ही महिला लुयांग शहरातील राहणारी आहे. अलिकडेच महिलेने चीनच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यात तिनं तिच्या हॉटेल रूममधील जुगाडाबाबत माहिती दिली. डॅंगनं सांगितलं की, ती अलिकडे एका हॉटेल रूममध्ये राहण्यास गेली होती. जिथे तिला गुप्त कॅमेरा असण्याची भीती सतावत होती. याच कारणानं तिनं बेडवरच एक टेंट तयार केला आणि त्यात ती झोपू लागली.
एका न्यूज चॅनलसोबत बोलताना महिलेनं सांगितलं की, तिनं अनेकदा ऐकलं होतं की, हॉटेलच्या रूममध्ये गुप्त कॅमेरे असतात. यामुळे ती सुद्धा चिंतेत होती. आधी तिनं विचार केला होता की, ती तिच्यासोबत एक टेंट घेऊन जाईल आणि त्यातच राहील. पण नंतर तिनं हा विचार सोडला. कारण टेंटची किंमत जास्त होती. याबदल्यात तिनं एक डस्ट शीट खरेदी केली, जी फर्निचर झाकण्यासाठी वापरली जाते. त्यासोबतच तिनं लांब दोरीही घेतली.
महिलेनं व्हिडिओत टेंट कसा तयार करावा याबाबतही माहिती दिली. डांग म्हणाला की, दोरी उंच जागी बांधा आणि वरून त्यावर चादर टाका. त्यानंतर चादरीचे कोपरे बेडच्या कोपऱ्यांमध्ये खोचून ठेवा. डांगनं बनवलेला हा टेंट १.७ मीटर उंच, २ मीटर लांब आणि २ मीट रूंद होता. डांगनं तिच्या व्हिडिओमध्ये ती थांबलेल्या हॉटेलचं नावही सांगितलं नाही आणि पत्ताही सांगितला नाही. तसेच ती त्या ठिकाणी कशासाठी गेली होती हेही सांगितलं नाही.