मंगळवारी नेदरलँड्च्या डेव्हेंटरमध्ये एका बेकरीत महिला एकटी असताना चोर शिरला. या प्रकरणानंतर तुर्की-डच बेकर तिच्या धाडसी कामगिरीमुळे चर्चेत आली आहे. (Woman Fights Off Robber With a Cleaning Cloth) तिनं चाकू किंवा मिरपूड स्प्रेन नाही साफसफाईच्या कापडानं चोराला बुकलून काढलं आणि स्वत:चा बचाव केला. या महिलेच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. त्यामुळेच तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. (Woman fights off robber with a cleaning cloth at her bakery in netherlands watch viral video)
ही घटना मेवलाना बेकरीमध्ये घडली आणि लतीफ बेकर बेकरीच्या काउंटरच्या मागे होती. तेव्हा हुडी घातलेला माणूस दुकानात शिरला आणि कॅश रजिस्टरकडे गेला. त्यावेळी तिनं कपडानं त्या व्यक्तीचा पाठलाग केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून तो लेखिका तानसू येगेन यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्याला आतापर्यंत 34,000 व्ह्यूज मिळाले आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये, तुम्ही काळ्या रंगाचा हुडी घातलेला एक माणूस क्षणार्धात बेकरीमध्ये प्रवेश करत थेट कॅश काऊंटरकडे जाताना पाहू शकता. मात्र चोराला येताना पाहून लतीफ अजिबात घाबरल्या नाहीत. त्यांनी त्यांच्या हातातलं साफसफाईचं कापड घेतलं आणि त्याला मारायला सुरूवात केली.
शाळेत उशीरा आल्याने विद्यार्थिनींना टॉयलेट साफ करण्याची शिक्षा; व्हिडिओ व्हायरल
पैसे चोरण्यापासून रोखण्यासाठी त्या चोराला दूर ढकलण्याचा पुरेपूर प्रयत्न त्यांनी केला. नेदरलँड्समधील तुर्की बेकर लतीफ पेकर यांनी स्वसंरक्षणार्थ साफसफाईचे कापड वापरून चोराला पळवून लावलं. साफसफाईच्या कापडाच्या शक्तीला कमी लेखू नका,” असे या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलं आहे.