सोशल मीडिया हे सध्या अतिशय ताकदीचे माध्यम असले तरी एका मर्यादेर्यंतच त्याचा वापर करणे ठिक आहे. अन्यथा प्रमाणापेक्षा जास्त वापर आपल्या तोट्याचा ठरु शकतो. काही जण सोशल मीडियाच्या इतके आहारी जातात की कोणत्या गोष्टी त्यावर किती प्रमाणात ओपन करायच्या याचे भानही त्यांना राहत नाही. सोशल मीडियावर अपडेट राहायच्या नादात अनेकदा ते आपल्या इतक्या खासगी गोष्टी या माध्यमातून शेअर करतात की शेवटी असे करणे त्यांच्या अंगाशी येऊ शकते. एका महिलेसोबत नुकतीच अशी घटना घडली आणि सोशल मीडियाद्वारे ऑफीसच्या गोष्टी जगजाहीर केल्यामुळे तिला थेट आपली नोकरीच गमवावी लागली (woman fired from job after the company found her videos discussing salary).
त्याचे झाले असे की, लेक्सी लार्सन नावाच्या एका महिलेने टिकटॉकवर एक व्हिडिओ शेअर केला होता. आपल्याला नवीन नोकरीमध्ये थोडीथोडकी नाही तर तब्बल ६ लाखांची वाढ मिळाली हे या महिलेने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले. त्यामुळे तिला ज्याठिकाणी नव्याने नोकरी मिळाली होती त्या कंपनीने तिची जॉब ऑफर रद्द केली. आपण साधारणपणे ठराविक वर्षांनी कंपनी बदलतो आणि चांगली आर्थिक वाढ घेऊन नवीन कंपनीत रुजू होतो. कंपनी बदलली की आपली आर्थिक वाढ होते हे जरी खरे असले तरी ते जाहीररित्या असे सगळ्यांना सांगावे का याचे भान असायला हवे. कंपनीने सुरक्षिततेचे कारण देत या महिलेला नोकरीवरुन काढून टाकल्याचे सांगितले. पहिल्या नोकरीमध्ये लेक्सी हिला ५६ लाख रुपये पगार होता. नवीन कंपनीने तिच्या पगारात १६ लाखांची वाढ करत तिला महिन्याला ७२ लाख पगार देण्याचे कबूल केले होते. मात्र अशाप्रकारे टिकटॉक व्हिडिओच्या माध्यमातून लेक्सीने आपली पैसे खर्च करण्याची सवय आणि वाढलेल्या पगाराची रक्कम याविषयी सांगितले.
पण कंपनी लेक्सीचे अकाऊंट शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजले तेव्हा बॉसच्या ओरड्यापासून वाचण्यासाठी तिने आपल्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ डिलिट केला. अशाप्रकारे पगारात झालेली वाढ जाहीर करणे कायद्यानुसार अचूक नव्हते. मग कंपनीने तिला नोकरीवरुन का काढले असा जाब तिने विचारला. तेव्हा कंपनीने कायद्याचे कोणतेही उल्लंघन झालेले नसले तरी आम्हाला अशाप्रकारची रिस्क घ्यायची नाही असे सांगितले. या व्हिडिओमुळे लेक्सीच्या टिकटॉक फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली. आता तिला ३३ हजार लोक फॉलो करत असून हा पगाराशी संबंधित व्हिडिओ १० लाखांहून अधिक जणांनी पाहिला. तिने पहिल्या नोकरीच्या ठिकाणी पुन्हा अर्ज केल्यानंतर तिला त्याठिकाणी परत नोकरीवर घेण्यात आल्याचे तिने माध्यमांशी बोलताना सांगितले.