घडाळ्याच्या काट्यावर, कसरत तारेवर.... असं खरोखरच प्रत्येक महिलेच्या आयुष्यात सुरू असतं. घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना, सगळ्यांच्या वेळा सांभाळताना तर त्या घरातल्या स्त्री ची अतिशय दमछाक होऊन जाते. त्यात जर ती वर्किंग वुमन असेल तर मग मात्र तिची होणारी धावपळ तर विचारायलाच नको. घर, करिअर यामध्ये कायम तिची ओढाताण होते. शिवाय घरात असताना ऑफिसच्या कामाला पुरेसा वेळ न देता येणं आणि ऑफिसमध्ये असताना घरातल्या मंडळींसाठी वेळ काढता न येणं, यामुळे तिच्या मनात असणारी अपराधी भावना तर आणखीनच वेगळी. हा सगळा व्याप सांभाळत ऑफिस गाठणाऱ्या आणि ऑफिसमध्ये जाताना दुचाकी चालवत झूम मिटिंग अटेंड करणाऱ्या एका वर्किंग वुमनने सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (netizens stunned by woman's work from traffic)
#PeakBengaluru या इन्स्टाग्राम पेजवरून याविषयीची पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ती महिला बेंगलोर शहरातली आहे. आता आपल्याला माहितीच आहे की कोणतंही महानगर म्हटलं की तिथे भरपूर ट्रॅफिक असणार.
उन्हामुळे सनबर्नचा त्रास? करा 'हा' जादुई उपाय, त्वचेला मिळेल थंडावा- टॅनिंग जाऊन उजळेल त्वचा
साधारण ऑफिसला जाण्या- येण्याच्या वेळेला तर ट्रॅफिकचे प्रमाण खूप जास्त वाढलेले असते. त्यामुळे थांबत थांबत गाडी चालवावी लागते. असंच एका महिलेला ऑफिसला जाताना भयानक ट्रॅफिक लागली. त्यामुळे ती बराच वेळ तिथे अडकून पडली. यामुळे मग शेवटी तिने तिचा फोन तिथेच त्या गर्दीत सुरू केला आणि झूम मिटिंग अटेंड केली.
तिचा हा वर्क फ्रॉम ट्रॅफिकचा नवा फंडा पाहून अनेक नेटिझन्स जाम चक्रावून गेले आहेत.
मुगाच्या डाळीची सुपर स्पाँजी इडली, भरपूर प्रोटीन देणारा चवदार नाश्ता- बघा सोपी रेसिपी
काही जणांच्या अशाही कमेंट आल्या आहेत की त्यांनाही बऱ्याचदा अशा पद्धतीने नाईलाजाने गाडी चालवत असतानाच ऑनलाईन मिटिंग अटेंड कराव्या लागल्या होत्या... काही जणांनी मात्र तिला स्वत:ची काळजी घ्यायचा सल्ला दिला असून कितीही जास्त घाई असली तरी अशा प्रकारचं धाडस करू नको, जिवाची काळजी घे, असा सल्ला दिला आहे..