एका महिलेसाठी, आई होणे हा स्वतःसाठी एक विशेष अनुभव आहे. पण वयाच्या 70 व्या वर्षी जर एखादी स्त्री आई बनली यावर तुमचा कधीच विश्वास बसणार नाही. गुजरातच्या कच्छमध्येही असेच घडले आहे. 70 वर्षीय जीवूबेन रबारी यांनी लग्नाच्या 45 वर्षानंतर एका मुलाला जन्म दिला आहे. मुलाला जन्म देणाऱ्या जगातील सर्वात वृद्ध महिला असल्याचा दावा जिवूबेन यांनी केला आहे. वयाच्या 70 व्या वर्षी मुलाचा जन्म झाल्यापासून जीवूबेन आणि त्यांचे पती पती मालधारी हे चर्चेत आहेत. (Woman gives birth to a child at 70 year)
नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान दोघांनीही आपल्या मुलाला अभिमानाने सगळ्यांना दाखवले. या जोडप्याला हे मूल आयव्हीएफ (IFV) तंत्राद्वारे मिळाले. दोघेही कच्छमधील मोरा या छोट्या गावाचे रहिवासी आहेत. मुलाच्या जन्मापासून कुटुंब आणि नातेवाईकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. विशेष म्हणजेच आई आणि मूल दोघेही पूर्णपणे निरोगी आहेत.
धक्कादायक! ३० वर्षांपासून ज्यांना स्वत:चे वडील समजत होती ते खरे वडील नव्हतेच; आईचं 'असं' फुटलं भांडं
जीवूबेन आणि मालधारी यांचं 45 वर्षांपूर्वी लग्न झालं. दोघांनाही मूल व्हावे अशी खूप इच्छा होती, पण काही समस्यांमुळे त्यांची इच्छा इतक्या वर्षांपर्यंत अपूर्ण राहिली. डॉ. नरेश भानुशाली यांनी जोडप्याला स्पष्टपणे सांगितले होते की, 'म्हातारपण आणि काही अडचणींमुळे मुलाला जन्म देणे कठीण होईल, पण या जोडप्याने देवावर विश्वास ठेवला आणि हे कठीण पाऊल उचललं.'
मुलाला जन्म देणारी सर्वात वयोवृद्ध महिला असल्याचा जीवूबेनचा दावा पुष्टीकृत झालेला नाही. 2009 मध्ये यूकेच्या एलिझाबेथ अदिनीने जगातील सर्वात वृद्ध आई होण्याचा विक्रम केला. त्यांच्या मुलाचा जन्म फक्त IVF तंत्राने झाला. खरं तर, यूके मध्ये, 50 वर्षांवरील महिलांसाठी आयव्हीएफ सुविधा नव्हती, यासाठी एलिझाबेथला युक्रेनला जावे लागले.