सोशल मीडियावर एका महिलेचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती लोकांना जेवण खाण्याची योग्य पद्धत सांगत आहे, परंतु व्हिडिओमध्ये लोकांना काय वाटले हे माहित नाही, ज्यामुळे लोक महिलेवर संतापले. माणिक कौर नावाच्या महिलेनं दोन भागांची मालिका शेअर केली आहे. (Woman gives tips on how to eat desi food in viral video) ज्यात त्या भारतीय जेवणाच्या टिप्स दाखवत आहेत. ट्विटरवर आणखी एक व्हिडिओ त्यांनी शेअर केला. जिथे लोकांनी त्यांचे विचार आणि जेवणाचे शिष्टाचार राखण्याचे मार्ग शेअर केले आहेत.
या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता डायनिंग टेबलजवळ बसलेली महिला सुरूवातील भातासह भाजी खाण्याची योग्य पद्धत दाखवते. त्यानंतर दही कसं खायचं हे सुद्धा शिकवते. काहीजणांनी या व्हिडीओला उत्तम असल्याचं म्हटलंय तर काहींनी व्हिडिओला आक्षेपार्ह आणि पाश्चात्य सांस्कृतिक लादण्याचे दुःखद वास्तव असल्याचे म्हणत संतापजनक कमेंट्स केल्या आहेत.
DiNiNg eTiQuetTes and it's just the worst takes ever. Anybody who says never pour your dal over chawal has a weird superiority complex for no reason. The same with people who look down on eating rice with hands pic.twitter.com/8BBcd6QRO3
— haryana grande (@itnamatsharma) January 15, 2022

इंस्टाग्रामवर mindful_living_by_manik_kaur या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर ट्विटरवरही ट्रोल झाला. १३ हजारापेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.