Lokmat Sakhi >Social Viral > लग्नात नाचता नाचता महिलेला आला हार्ट अटॅक; स्टेजवरून खाली पडताच सोडले प्राण; पाहा Video

लग्नात नाचता नाचता महिलेला आला हार्ट अटॅक; स्टेजवरून खाली पडताच सोडले प्राण; पाहा Video

woman got heart attack while dancing in seoni : गेल्या काही दिवसांपासून नाचताना आणि व्यायामशाळेत  हृदयविकार आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 11:16 AM2022-12-16T11:16:17+5:302022-12-16T11:19:30+5:30

woman got heart attack while dancing in seoni : गेल्या काही दिवसांपासून नाचताना आणि व्यायामशाळेत  हृदयविकार आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

Woman got heart attack while dancing : woman got heart attack while dancing in seoni | लग्नात नाचता नाचता महिलेला आला हार्ट अटॅक; स्टेजवरून खाली पडताच सोडले प्राण; पाहा Video

लग्नात नाचता नाचता महिलेला आला हार्ट अटॅक; स्टेजवरून खाली पडताच सोडले प्राण; पाहा Video

लग्नात नाचगाण्यांशिवाय अजिबात मजा येत नाही. आपल्या प्रियजनांच्या लग्नात लोक आनंदात बेभान होऊन नाचतात. काहीजण तर  खास नाचण्यासाठी लग्न किंवा हळदीला जातात.  लग्नात नाचणाऱ्या महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडिओ व्हायरल होण्याचं मूळ कारण म्हणजे नाचता नाचता  या महिलेला हृदयविकाराचा झटका आल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी मध्यप्रदेशातील रात बंडोलमधील बखारी गावात हा प्रकार घडला. (woman got heart attack while dancing in madhya pradesh)

14 डिसेंबरच्या रात्रीलग्न समारंभाच्या आधी संगीताचा कार्यक्रम सुरू होता, त्यात कुटुंबातील महिला स्टेजवर नाचत होत्या. त्याचवेळी नाचताना एक महिला स्टेजवर पडली. त्वरीत महिलेला सिवनी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृत महिलेचं नाव जथाबाई आहे. ५५ ​​वर्षीय जथाबाई या डान्स करत असताना अचानक स्टेजवर पडल्या.

लोकांनी पाहिल्यानंतर महिलेला तात्काळ सिवनी येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून महिलेला जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार महिलेचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. पोलिस स्थानक प्रभारी पंचेश्वर यांनी सांगितले की, शोकाकुल वातावरणात महिलेवर कुटुंबीयांनी गुरुवारी अंत्यसंस्कार केले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

लाईव्ह परफॉर्मन्सवेळी स्टेजवर अचानक कुत्रा आला, अन् डान्सरनं असं काही केलं, पाहा व्हिडिओ

गेल्या काही दिवसांपासून नाचताना आणि व्यायामशाळेत  हृदयविकार आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. असाच प्रकार लखनौच्या भडवाना गावात घडला होता. जिथे नववधू वराला हार घालत असतानाच ती अचानक खाली पडली. त्यानंतर वधूला जवळच्या रुग्णालयात नेले गेले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. वधूच्या मृत्यूचे कारणही हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Woman got heart attack while dancing : woman got heart attack while dancing in seoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.