लहान मुलं असो किंवा अगदी गुंडांची एखादी टोळी असो आपल्या गटातील एखाद्या मुलाला कोणी मारलं तर त्याला वाचवण्यासाठी किंवा त्याला मारल्याचा बदला घेण्यासाठी आपण लगेच धावून जातो. आता माणसांमध्ये एकमेकांविषयी इतकी एकी आणि सहानुभूती असते हे ठिक आहे. पण प्राण्यांमध्येही अशाप्रकारची सपोर्ट सिस्टीम असल्याचे आपण कधी पाहिले नसेल. मात्र नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून हे दिसून आले आहे. एका महिलेने तिच्या समोर उभ्या असलेल्या एका कोंबडीला खालचे काहीतरी उचलून मारले. ती आकाराने लहान असलेली कोंबडी फार काही करु शकली नाही, तिने आपली जागा बदलली आणि ती पुढे निघून गेली (Woman Hit The Chicken Then Sheep Hit Her Watch Viral Video).
मात्र हे सुरू होते त्याच्या बाजूला मेंढ्यांचा एक कळप उभा होता. यातील काही मेंढ्या महिला करत असलेले कृत्य पाहत होत्या. महिला कोंबडीला अशाप्रकारे त्रास देत असल्याचे पाहून या कळपातील एक मेंढी चांगलीच चिडली आणि तिने या महिलेच्या मागे धावत जाऊन या महिलेला धक्का दिला. सुरुवातीला मेंढी महिलेला जोरात जाऊन धडकली तेव्हा अंगाने नाजूक असलेली ही महिला खाली पडली. ती उठण्याचा प्रयत्न करत असतानाच ही मेंढी मागून पुन्हा तिच्याकडे आली आणि तिने पुन्हा एकदा या महिलेला जोरदार धक्का दिला. त्यानंतर महिला उठून स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसले. मात्र ही मेंढी तिच्यामागे रागाने धावायला लागली आणि मग तिच्यासोबत असलेल्या इतर मेंढ्याही व्हिडिओच्या शेवटी तिच्यामागे धावताना दिसल्या.
Animals decided to gang up and attack.... pic.twitter.com/6LT1mppTrO
— Dr.Samrat Gowda IFS (@IfsSamrat) October 19, 2022
हा व्हिडिओ ट्विटरवर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी तो रिट्विटही केला आहे. हा २३ सेकंदांचा व्हिडिओ आतापर्यंत ४० हजार जणांनी पाहिला आहे. इंडीयन फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये अधिकारी असलेले डॉ. सम्राट गावडा यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटरवरुन शेअर केला आहे. प्राणी जेव्हा एकत्र येऊन अॅटॅक करण्याचा प्रयत्न करतात अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिली आहे. त्यामुळे कोणालाही विनाकारण त्रास द्यायला जाल तर त्याची अशाप्रकारे शिक्षा भोगावी लागेल असेच या व्हिडिओमधून दिसून येते.