Join us  

आई होण्याच्या आनंदात ९ महिने वाट पाहिली; अन् पोटात जे होतं ते पाहून डॉक्टर्स हादरले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 4:36 PM

Baby Bump Turns To Ovarian Cyst : तिच्या पोटात मूल नव्हते तर काहीतरी वेगळेच होते.

आई होणे हा मुलीसाठी जगातील सर्वोत्तम अनुभव असतो. प्रत्येक मुलीला तिच्या आयुष्यात आई व्हायची इच्छा असते. मात्र, या काळात त्यांना अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागते. गरोदर राहिल्यानंतर तिचे पोट कालांतराने वाढू लागते. 9 महिन्यांपर्यंत पोटाचा आकार खूप मोठा होतो, पण लंडनमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे.  (Baby bump turns out to be ovarian cyst) येथे एका मुलीने 9 महिन्यांनंतरही मूल न झाल्याने वाढलेल्या पोटाचा अल्ट्रासाऊंड केला, तेव्हा त्याचा अहवाल पाहून डॉक्टरही चक्रावून गले. (Woman horror as nine month baby bump turns out to be ovarian cyst the size of a football)

कारण पोटात बाळाऐवजी दुसरेच काहीतरी होते. डेली स्टारनं दिलेल्या माहितीनुसार लंडनमध्ये राहणाऱ्या हॉली वेल्हॅम या मुलीचे वय २१ वर्षे आहे. हॉली वेल्हॅम एका मुलासोबत रिलेशनशिपमध्ये आहे, पण सध्या ती कुटुंबासोबत राहते. हॉलीचे पोट 7-8 महिन्यांपूर्वी वाढू लागले. तिला वाटले की ती गरोदर आहे. मुलाच्या आशेने तिने 9 महिने वाट पाहिली. 9 महिने पूर्ण झाल्यानंतरही मूल जन्माला आले नाही, पण तिला मळमळ होऊ लागली. होलीने मे २०२२ मध्ये ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांनी अल्ट्रासाऊंड केले.

अल्ट्रासाऊंड रिपोर्ट आल्यावर हॉलीसोबतच डॉक्टरही अवाक् झाले. कारण हॉली गर्भवती नसल्याचं यावेळी दिसून आलं. तिच्या पोटात मूल नव्हते तर काहीतरी वेगळेच होते. डॉक्टरांनी हॉलीला सांगितले की तुमच्या उजव्या अंडाशयाजवळ एक मोठी ओव्हेरियन सिस्ट आहे आणि त्यामुळे तुमच्या पोटाचा आकार वाढला आहे.

२७ सेमी पेक्षा मोठा ओव्हरियन सिस्ट

रिपोर्टनुसार, ओव्हेरियन सिस्टचा आकार मोठा असल्याने डॉक्टरांनी लगेच हॉलीला ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. शस्त्रक्रियेनंतर, पोटापासून 27 सेंटीमीटरपेक्षा मोठा म्हणजेच फुटबॉलपेक्षा मोठे सिस्ट बाहेर आले. एवढेच नाही तर पोटात द्रव साचल्याने हॉलीचे पोट अधिकच फुगले होते. शस्त्रक्रियेत डॉक्टरांनी हॉलीच्या उजव्या अंडाशयाला आणि फॅलोपियन ट्यूबला जोडलेले सिस्ट वेगळे केले. तिचेअंडाशयही डॉक्टरांना काढावे लागले.

पनीरपासून बाजरीच्या भाकरीपर्यंत; प्रोटीनसाठी रोजच्या जेवणात हे पदार्थ खातात सेलिब्रिटी

डॉक्टरांचं म्हणणं ऐकून हॉलीची प्रतिक्रिया

पीडित हॉलीने मीडियाला सांगितले की, ''माझे पोट पाहून मला खूप आनंद व्हायचा, मी आई होणार आहे याच आनंदात आम्ही होतो, पण 9 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जेव्हा समजले की, माझ्या पोटात दुसरे काहीच नाही तेव्हा मी खूप निराश झाले. या परिस्थितीत माझे कुटुंब, माझा प्रियकर आणि मित्र ज्या प्रकारे माझ्या पाठीशी उभे राहिले त्याबद्दल मला खूप चांगले वाटते. मला आशा आहे की भविष्यात मी नक्कीच आई होईल.'' 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया