Lokmat Sakhi >Social Viral > सवत माझी लाडकी? नवऱ्यावर प्रेम म्हणून बायकोनं स्वत: त्याचं दुसरं लग्न प्रेयसीशी लावून दिलं..

सवत माझी लाडकी? नवऱ्यावर प्रेम म्हणून बायकोनं स्वत: त्याचं दुसरं लग्न प्रेयसीशी लावून दिलं..

सिनेमात दाखवतात ते सगळं अतार्किक आणि अतीरंजीत वाटत असेल तर ही त्याहून फिल्मी स्टोरी वाचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2022 04:52 PM2022-09-30T16:52:58+5:302022-09-30T16:55:45+5:30

सिनेमात दाखवतात ते सगळं अतार्किक आणि अतीरंजीत वाटत असेल तर ही त्याहून फिल्मी स्टोरी वाचा..

woman in Andhra Pradesh reportedly got her husband married to his ex-girlfriend | सवत माझी लाडकी? नवऱ्यावर प्रेम म्हणून बायकोनं स्वत: त्याचं दुसरं लग्न प्रेयसीशी लावून दिलं..

सवत माझी लाडकी? नवऱ्यावर प्रेम म्हणून बायकोनं स्वत: त्याचं दुसरं लग्न प्रेयसीशी लावून दिलं..

Highlightsही भलतीच लव्हस्टोरी. सवत माझी लाडकी..

हम दिल दे चुके सनम नावाचा सिनेमा पाहिला आहे ना? बायकोला तिच्या प्रियकराकडे पाेहचवण्यासाठी थेट युरोप गाठणारी गोष्ट. मराठी सिनेमाही गाजला होता एक सवत माझी लाडकी नावाचा. तर अशीच एक घटना आंध्रप्रदेशात घडली आहे. एका महिलेनं स्वत:हून आपल्या नवऱ्याचं लग्न त्याच्या आधीच्या प्रेयसीशी लावून दिलं आणि आता ते एकाच घरात सुखानं नांदू लागले आहेत. तिघे आपले फोटो सोशल मीडियात टाकत आहेत. ते व्हायरलही होत आहेत. असं कुणी महिला का करेल आणि ही गोष्ट खरीच का असे प्रश्नही त्यामुळे अनेकांना पडले आहेत. पण घटना मात्र खरी असल्याचे कळते.
आंध्रप्रदेशात डक्कीली नावाच्या गावची ही गोष्ट. कल्याण नावाचा तिथं एक व्हिडिओ कंटेट एडिटर आहे. त्याच्या दुसऱ्या लग्नाची ही गोष्ट. इंडिया टाइम्सने प्रसिध्द केलेल्या बातमीत कल्याण विषयी अधिक माहिती मिळते. कल्याणचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं. विमलाची आणि त्याची सोशल मीडियात ओळख झाली आणि त्यांनी लग्न केलं. मात्र लग्नानंतर विमलाला कळलं की कल्याणचं नित्या श्री नावाच्या विशाखापट्टणमच्या एका मुलीवर प्रेम होतं. ती सोशल मीडिया एन्फ्ल्यूएन्सर आहे आणि कल्याणची आणि तिची जोडी बरीच गाजलीही होती. मात्र पुढे त्यांचं ब्रेकअप झालं पण अजूनही त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे.

(Image : google)

आणि मग विमलाने नित्या आणि कल्याणचं लग्न स्वत: एका देवळात लावून दिलं. आता तिनं त्या दोघांना कसं पटवलं, आपल्याच नवऱ्याचं दुसऱ्या बाईशी लग्न लावून द्यावं यामागे खरंच तिचं प्रेम की आणखी काही याचा तपशील काही कळू शकलेला नाही. 
मात्र बातम्या सांगतात की आता ते तिघे एकाच घरात राहतात आणि आनंदातही आहे.
सिनेमात जे घडतं ते अनेकदा आपल्याला अवास्तव, अतिरेकी रंजक आणि खोटंही वाटतं. मात्र प्रत्यक्षातही असं काही घडू शकतं त्याचं उदाहरण आहे ही भलतीच लव्हस्टोरी. सवत माझी लाडकी हा सिनेमाच झाला हा..
 

Web Title: woman in Andhra Pradesh reportedly got her husband married to his ex-girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.