Join us

महिलेची कमाल! एका वर्षात केले ३ लग्न आणि कमावले ३६ लाख, फ्लॅश मॅरेज करून तरुणांना फसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2024 11:55 IST

What Is Flash Marriages?: फ्लॅश मॅरेज करून होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण सध्या खूप वाढले आहे. बघा हा प्रकार नेमका काय असतो आणि कशा पद्धतीने यामध्ये फसवणूक केली जाते...(woman earn 35 lakh in 3 months from flash marriages)

ठळक मुद्देहा प्रकार सध्या चीनमध्ये खूप फोफावला असून लग्न ठरवताना कुटूंबियांनी सतर्क राहावे, असे आवाहन तिथले पोलिसही करत आहेत. 

आपल्या संस्कृतीनुसार लग्न म्हणजे हे फक्त दोन व्यक्तींचच नाही तर दोन कुटूंबांचं नातं जोडणारा एक पवित्र आणि अतिशय महत्त्वाचा असा विधी असतो. पण हल्ली लग्नसंस्थाच मोडकळीस आणतील अशा काही घटना होताना आपण वारंवार बघत आहोत. त्याविषयी ऐकत आहोत. आता त्याचा कळस म्हणजे फ्लॅश मॅरेज हा फसवणुकीचा नवा प्रकार. एका वर्षाच्या आतच ३ तरुणांशी फ्लॅश मॅरेज करून त्यांना थोडाथोडका नाही तर तब्बल ३६ लाखांचा गंडा घालणाऱ्या महिलेचा किस्सा नुकताच चीनमध्ये उघडकीस आला आहे (woman earn 35 lakh in 3 months from flash marriages). बघा फ्लॅश मॅरेज हा प्रकार नेमका असतो तरी कसा...(What Is Flash Marriages?)

 

चीनच्या वृत्तसंस्थांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार चीनमध्ये एका महिलेने डिसेंबर २०२३ मध्ये एका तरुणाशी विवाह केला. सोशल मिडियाच्या माध्यमातून त्या दोघांची ओळख झाली आणि त्याच्याशी मैत्रीचे, प्रेमाचे नाटक करत ती त्याच्या जवळ गेली.

पोळी-भात खाणं सोडल्याने वजन खरोखर कमी होतं? आहारतज्ज्ञ सांगतात. वाढलेली चरबी कमी करण्यासाठी.... 

दोघांनी लग्न केले. चीनमध्ये वधूला होणाऱ्या नवऱ्याकडून तसेच त्याच्या कुटूंबाकडून ब्राईड मनी म्हणजेच काही रोख रक्कम देण्यात येत असते. ती रक्कम या महिलेने घेतली. त्यानंतर लग्नानंतर दोन- तीन महिने संसारही केला. पण त्यानंतर वेगवेगळे निमित्त काढून तिने तिच्या नवऱ्याला घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात अडकवले आणि त्याच्यापासून विभक्त झाली. नवऱ्याकडून मिळालेले पैसे तिने परत केले नाहीत. 

 

अशा पद्धतीने एका नंतर एक तिने आणखी दोन विवाह केले. त्या दोघांशीही सुरुवातीला दोन- तीन महिने चांगले संबंध ठेवले आणि त्यानंतर त्यांनाही वेगवेगळ्या हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये अडकवले.

वजन कमी करण्यासाठी हिवाळा आहे एकदम परफेक्ट! रोज खा 'या' भाज्या आणि भराभर वजन उतरवा

त्यांच्याकडूनही तिने ब्राईड मनी म्हणून भरपूर रक्कम घेतली होती. ही तिन्ही प्रकरणं जेव्हा पोलिसांपर्यंत गेली तेव्हा त्या महिलेने केलेला बदमाशपणा लक्षात आला. अशा पद्धतीने विवाहाचे जे नाटक केले जाते त्याला फ्लॅश मॅरेज म्हणतात. हा प्रकार सध्या चीनमध्ये खूप फोफावला असून लग्न ठरवताना कुटूंबियांनी सतर्क राहावे, असे आवाहन तिथले पोलिसही करत आहेत. 

 

टॅग्स :सोशल व्हायरललग्न