Join us  

लेकीची माया अशी की आईला घरी आणण्यासाठी १६०० किलोमीटरचा प्रवास करत गेली.. आईसाठी काहीपण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2024 9:16 PM

Woman in China travels 1,600km to pick up mother for Chinese New Year reunion : इमोशनल व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी, मुलीने आईसाठी केलं असं काही की..

मुली आणि आईचं नातं फार वेगळं असतं. बऱ्याचदा मुली आणि आईच्या नात्यात मैत्री येते. आईमध्ये एक शिक्षिका देखील दडलेली असते. जी प्रत्येक टप्प्यात शिकवणी देत असते. पण आता जसा काळ बदलत चालला आहे, त्याप्रमाणे मुलं आपल्या पाल्यांना विविध गोष्टींची माहिती आणि शिकवणी देत असतात. बऱ्याचदा पालकांना अॅडवान्स टेक्नोलॉजी लवकर कळून येत नाही.

बऱ्याच गोष्टी त्या पहिल्यांदा करतात. ज्यामुळे त्यांच्यामध्ये भीती तर असतेच. शिवाय ती गोष्ट त्यांच्याकडून पूर्ण होत नाही. अशाच एका आई-लेकीच्या नात्याची गोष्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे (Social Viral). ज्यात एका मुलीने आपल्या आईला प्रवास करायला जमत नाही म्हणून १६०० किमीचा प्रवास करत आईला स्वगृही परत आणले असून, आता फॅमिली मिळून आगामी चीनी नववर्ष उत्साहात साजरा करणार आहे(Woman in China travels 1,600km to pick up mother for Chinese New Year reunion).

आई कामानिमित्त वेगळ्या प्रांतात

ली क्युशुआंग हिने पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार, तिचे पालक २० वर्षांपूर्वी फुजियान येथे कामानिमित्त गेले होते. दरवर्षी स्प्रिंग फेस्टिव्हलच्या आधी ते एकत्र चोंगकिंगला परतात. पण २०२४ च्या सुरुवातीला आजीच्या आजारपणामुळे, ली क्युशुआंग हिचे वडील लवकर त्यांच्या गावी परतले. पण कामासाठी आई फुजियान येथे एकटी राहिली. त्या ठिकाणी तिची आई बूट बनवण्याच्या कारखान्यात काम करते.

कामानिमित्त आई घरापासून दूर

आईने ली क्युशुआंगशी कॉलदरम्यान आपण यंदाच्या चीनी नववर्ष साजरा करण्यासाठी येऊ शकणार नाही असे सांगितले. कारण वडील आजीच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी स्वगृही परतले. शिवाय पैसे कमावण्यासाठी यासह प्रवास करायला जमत नसल्यामुळे त्यांनी यायला नकार दिला.

कपड्यांवरचे डाग काढायचा घ्या सोपा फॉर्म्युला, १ चमचा सॅनिटायझरची जादू-न घासता कपडे चकाचक

यासगळ्या गोष्टी लक्षात ठेवता, ली क्युशुआंग हिने ताबडतोब तिच्या आईला घरी आणण्यासाठी फ्लाईटचे तिकिटे काढली, आणि १६०० किमीचा प्रवास करत आईला स्वगृही परत आणले.

व्हिडिओ शूट केला, पोस्ट करताच झाला व्हायरल; कारण..

तिने प्रवास करताना एक व्हिडिओ शूट करून सोशल मीडियात शेअर केला. या व्हिडिओमध्ये ली क्युशुआंग म्हणते, 'माझी आई जास्त बाहेर पडत नाही. २० वर्षांहून अधिक काळ ती गावात काम करत आहे. तिला टॅक्सी, बस एकंदर्रीत तिला प्रवास करायला जमत नाही. त्यामुळे मुलगी म्हणून मला वैयक्तिकरित्या जाऊन तिला परत आणणे ही माझी जबाबदारी वाटते.'

निर्मला सीतारामन : भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री ते जगातील शक्तीशाली महिला, मध्यमवर्ग ते विक्रमी वाटचाल

ती पुढे म्हणते, '१६०० किमीचा प्रवास गाठत मी फुजियान येथील आईच्या घराबाहेर पोहचले. बाहेर शांतपणे उभी राहून  मी तिला व्हिडिओ कॉल लावला. व्हिडिओ कॉलमध्ये आई जेवण बनवत होती. तेवढ्यात मी व्हिडिओ कॉल ठेवला आणि दार ठोठावले. तेव्हा आईने दार उघडले, आणि तिला आश्चर्याचा धक्का बसला. आईच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. तिला मी घेऊन आमच्या घरी नववर्षाच्या स्वागतासाठी घेऊन आले.' सध्या हा इमोशनल व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून, अनेकांनी कमेंट करत मुलीचं कौतुक केलं आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया