२०१८ साली श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री' चित्रपटातील पंकज त्रिपाठी यांचा "वो स्त्री है... वो कुछ भी कर सकती है...." हा डायलॉग खूपच फेमस झाला. हा डायलॉग फक्त त्या चित्रपटापुरताच मर्यादित नसून आपल्या खऱ्या आयुष्यात सुद्धा तितकाच लागू होतो. जर एखाद्या स्त्रीने ठरवलं तर असं कोणतं कामच नाही की ती करू शकत नाही. जर तिने एकदा का मनाशी निश्चय केला तर ती गोष्ट करून राहिल्याशिवाय ती थांबणारच नाही. सोशल मीडियावर स्त्रियांचे असे अनेक व्हायरल व्हिडीओ आपण रोज बघतो. कधी ती घागरा - चोली घालून बुलेटवर स्वार होते, तर कधी एकटीच चोरांशी दहा हात करते, कधी आपल्या पोटच्या गोळ्याला संकटातून वाचवते अशाप्रकारे स्त्रीच्या विविध रूपांचे दर्शन आपल्याला पदोपदी घडते. स्त्रीने जर आपली शारीरिक आणि बौद्धिक शक्ती एकवटली तर ती थेट तिला हवं ते साध्य करू शकते. अशीच काहीशी एक धाडसी महिला सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या धाडसाचं आणि साहसी वृत्तीच कौतुकच करायला पाहिजे(Woman leans over edge of 380-feet-tall Victoria Falls).
तिने नक्की काय धाडस केलंय पाहूया तरी...
हा व्हिडीओ एकूण १५ सेकंदांचा आहे. झांबिया - झिम्बाब्बेच्या सीमेवरील जगातील सर्वात मोठा मानला जाणारा विक्टोरीया धबधबा आहे. हा धबधबा ३८० फूट खोल आहे. जगातील सर्वात उंच धबधब्यावरून खाली पाहणे हा इथे येणाऱ्या पर्यटकांचा एक साहसी खेळ आहे, परंतु सगळ्याच पर्यटकांना हे साहस जमेल असं नाही. एक धाडसी महिला या धबधब्याच्या अगदी काठावरून खाली वाकून डेव्हिल्स पूल बघण्यात मग्न आहे. इतक्या फूट खोल धबधब्यावरून खाली पाहणे हे खूप मोठे धाडसचं म्हणावे लागेल.
कॅप्शनमध्ये काय लिहिलंय...
Weird and Terrifying या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ३८० फूट खोल धबधब्याजवळ उभे राहणे म्हणजे काय असते ते आताच शिकलो आहे. (डेव्हिल्स पूल - विक्टोरीया धबधबा) अशी सुंदर कॅप्शन देऊन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
नेटकरी काय म्हणत आहेत 'तिच्या' साहसाबद्दल ...
१५ सेकंदांच्या या व्हिडिओला १९ मिलियन्स पेक्षा जास्त व्युज मिळाले आहेत. या महिलेला असं काठावर झुकताना बघून काही नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले तर काही नेटकरी हा व्हिडीओ बघून भलतेच घाबरले आहेत. 'हे बघून मला फक्त आणि फक्त भीती वाटली' अशी कमेंट एका युजरने केली आहे. 'नाही... मी हे कधीच करू शकत नाही' अशी प्रतिक्रिया युजरने दिली आहे. 'माझ्याकडे सुद्धा ड्रोन आणि व्ही.आर हेडसेट आहेत पण मी कधीच त्यांना असं धबधब्याच्या काठाजवळ ठेवत नाही' अशी कमेंट या महिलेचा व्हिडीओ शूट करण्याऱ्या कॅमेरामनला उद्देशून दिली आहे.