घनदाट जंगलात कोण कसं अडकलं, कशी सुटका झाली असे किस्से आपण चित्रपटातच पहिले असतील. पण कधी खऱ्या आयुष्यात असं कोणी खरंच जंगलात अडकलं आणि खायला अन्नपाणीच नसेल तर? ही अशीच एक घटना ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा या ठिकाणी घडलेली आहे. कॅनबेरातील घनदाट जंगलात तब्बल ५ दिवस एक महिला अडकून पडली होती, अखेरीस पोलिसांनी तिचा शोध घेतला आहे. मुख्य म्हणजे ५ दिवस वाईन पिऊन आणि लॉलीपॉप खाऊन बिचारीने दिवस काढले. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे(Woman Lost In Forest Survives Five Days On Wine And Lollipops).
४८ वर्षीय जंगलात अडकलेल्या महिलेचे नाव लिलियन असे आहे. ही ऑस्ट्रेलियन महिला व्हिक्टोरिया हाय कंट्रीच्या सहलीवर होती. ती तिच्या गाडीतून प्रवास करत होती. यादरम्यान ती रस्ता चुकली आणि जंगलात हरवली. गाडी चालवत असताना तिची गाडी अचानक चिखलात अडकली, तिथेच फसली. यावेळी तिच्या मोबाईलला ना नेटवर्क होते ना गाडीचा जीपीएस काम करत होता. अशा स्थितीत काय करावे हे त्या महिलेला सुचत नव्हते.
बराच काळ लिलियनशी संपर्क साधता न आल्यामुळे तिच्या कुटुबियांना तिची काळजी वाटत होती. लिलियनला शोधण्यासाठी बचाव पथकाने हेलिकॉप्टरची मदत घेतली. त्यानंतर शोध पथकाला जंगलात एक कार दिसली. त्यानंतर लिलियनपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलं आणि तिची सुटका करण्यात आली.
घटस्फोट झाला म्हणून लग्नात फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरकडेच बाईने मागितले पैसे! हे काय अजब प्रकरण..
याविषयी लिलियनने सांगितले की, तिच्याकडे खाण्यापिण्यासाठी विशेष काही नव्हते. वाईन व लॉलीपॉप खाऊन दिवस काढले. जेव्हा बचाव पथकाने हे ऐकले की लिलियन इतके दिवस लॉलीपॉप खाऊन आणि वाईन पिऊन जगली, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. रेस्क्यू टीमने तिच्या बचाव कार्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे. व्हिडिओ शेअर करताना रेस्क्यू टीमने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तो क्षण पाहा जेव्हा एअर विंगने घनदाट जंगलात पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा शोध घेतला'.
फ्रिजचा डोअर रबर कळकट - खराब झालाय? ५ टिप्स, स्वच्छता झटपट-फ्रिज दिसेल नव्यासारखा
या घटनेबाबत, स्थानिक पोलीस प्राधिकरणाचे सार्जंट मार्टिन टॉर्प म्हणाले, 'लिलियन वाईन पीत नाही. ही वाईनची बाटली तिने आईसाठी भेट म्हणून देण्यासाठी खरेदी केली होती. तिने स्वतःसाठी काही स्नॅक्स आणि लॉलीपॉप घेतले होते, पण ती पाणी घ्यायला विसरली होती. पण नाईलाजाने तिला वाईन प्यावी लागली.'' सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून, नेटकरी या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहे.