इडली चटणी हा दक्षिण भारतीय पदार्थ अनेकांचा फेव्हरिट नाश्ता आहे. इडली चिली, इडली फ्राय असे अनेक पदार्थ तुम्ही खाल्ले असतील. पण कधी निळी इडली खाल्लीये का? सध्या सोशल मीडियावर निळ्या इडलीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. या रंगाची इडली पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. या रंगाची इडली तयार केली कशी असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (Woman makes blue idlis using butterfly pea flowers video sparks chatter)
खाद्यपदार्थ अधिक आकर्षक दिसण्यासाठी विविध पदार्थांमध्ये अनेकदा रंग मिसळले जातात. बटरफ्या पी फुलांचा वापर करून एक महिला निळ्या रंगाची #इडली बनवतानाचा असाच एक व्हिडिओ नुकताच ऑनलाइन पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर झाल्यापासून एकच खळबळ उडाली आहे.
भरपूर फारळ खाऊनही अजिबात वाढणार नाही कोलेस्टेरॉल; वाचा काय खायचं, काय टाळायचं
सोशल मीडियावर jyotiz_kitchen नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “ब्लू पी इडली,” असं कॅप्शन या व्हिडिओला दिलंय. या महिलेनं बटरफ्लाय पी झाडांची फुले तोडून उकळून घेतली नंतर ते मिश्रण गाळून घेतले आणि इडलीच्या पिठात मिसळले. त्यानंतर इडल्या निळ्या रंगाच्या झालेल्या दिसून आल्या.
या व्हिडिओला आतापर्यंत ८.२ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं असून दिवसेंदिवस हा व्हिडिओ अधिकच व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ३२ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. खाद्यप्रेमी या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी या प्रयोग ट्राय करणार असल्याचं सांगितलं आहे.