"प्रेमात माणूस आंधळा होतो" अस आपल्याकडे म्हटलं जात. कसमे - वादे केले जातात. प्रेम व्यक्त करण्यासाठी कोण कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही. प्रेमात असताना एकमेकांसाठक्ष चांदतारे तोडून आणण्याचं वचनही दिलं जातं. जोडपी इतकी बुडून जातात की त्यांना कशाचं भानच राहत नाही. प्रेमात माणसू काहीवेळा स्वतःला न आवडणाऱ्या गोष्टी देखील अगदी सहज करून जातो. थोडक्यात काय तर प्रेमात माणूस राग विसरून फक्त आवडत्या व्यक्तीच्या गोष्टींना प्राधान्य देतो. आणि प्रियकरानं विमानातून बसून जाऊ नये म्हणून ते विमानच थांबवण्याची फिल्मी गोष्ट तर सिनेमात पाहूनही आपण हसतोच. पण एका तरुणीनं तसंच केलं आणि सगळ्या व्यवस्थेला वेठीस धरलं(Pune Woman Drops The B-Word To Halt Boyfriend's Flight From Bengaluru Airport).
इंद्रा राजवार या २९ वर्षीय महिलेने एक अजबच पराक्रम केला. २६ जून रोजी इंद्रा राजवार यांनी अचानक बंगळूरुच्या केम्पेगौडा एअर पोर्टवर फोन केला. विमानात मीर रझा मेहदी आहे आणि त्याच्याकडे बॉम्ब आहे आणि तो बंगळुरू वरून मुंबईला विमानाने जाणार आहे असं सांगितलं. सगळी दाणादाण उडाली. अधिक चौकशी केल्यांनतर समजलं की ज्याच्याविषयी तक्रार केली तो तिचा प्रियकर(Women fakes bomb threat to stop boyfriend at Bengaluru airport)
हिंदूस्थान टाइम्सने हे वृत्त प्रसिध्द केले आहे. त्या वृत्तातल्या तपशिलानुसार इंद्रा राजवार या २९ वर्षीय महिलेने एक अजबच पराक्रम केला. २६ जून रोजी इंद्रा राजवार यांनी अचानक बंगळूरुच्या केम्पेगौडा एअर पोर्टवर फोन केला. विमानात मीर रझा मेहदी आहे आणि त्याच्याकडे बॉम्ब आहे आणि तो बंगळुरू वरून मुंबईला विमानाने जाणार आहे असं सांगितलं. सगळी दाणादाण उडाली. अधिक चौकशी केल्यांनतर समजलं की ज्याच्याविषयी तक्रार केली तो तिचा प्रियकर. मुंबईला जाणाऱ्या विमानात बसून त्यानं दूर जाऊ नये म्हणून म्हणे तिनं असं केलं. या गुन्ह्याबद्दल आयपीसी कलम ५०५ (१)(बी) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.