इंटरनेटचा वापर आणि सोशल मीडियाचा प्रभाव गेल्या काही वर्षात इतका जास्त वाढला आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि सर्वच स्तरातील व्यक्ती अगदी सर्रास सोशल मीडियाचा वापर करताना दिसतात. एकमेकांशी सतत कनेक्ट राहण्यासाठी आणि काहीसे मनोरंजन म्हणूनही इन्स्टाग्राम, व्हॉटसअॅप, फेसबुक, युट्यूब यांसारख्या माध्यमांचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्या घरी कामाला येणाऱ्या मावशी, रोजंदारीवर काम कऱणारे ते मोठमोठ्या कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदावर काम करणारे अधिकारीही सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात (Viral Video). इन्स्टाग्रामच्या रील्सने तर अनेकांना भुरळ घातली असून तरुणांमध्ये याचे खूप वेड असलेले पाहायला मिळते. नुकतेच एक रील व्हायरल झाले असून त्याविषयी सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्याचे पाहायला मिळते (Woman Making Instagram Reel Selling Bhelpuri at Railway Station).
तर रेल्वे स्टेशनवर भेळपुरी विकणारी एक तरुणी हे रील करत असून ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. या तरुणीचे हे रील नेटीझन्सना बरेच आवडले असून तिचे बरेच कौतुक होताना दिसत आहे. संगीता गायकवाड असे या इन्स्टाग्राम अकाऊंटचे नाव असून या महिलेने आपल्या कानात हेडफोन्स लावून बॉलिवूडच्या गाण्यावर हे छानसे रील बनवले आहे. ‘बनके दिवाना मेरा पिछा ना कर...’ या गाण्यावर ती अतिशय उत्तम हावभाव करताना दिसत आहे. स्टेशनवर असणाऱ्या एका बाकड्यावर बसून तिने आपल्या समोर भेळपुरीची टोपली ठेवल्याचे दिसत आहे. तर निळ्या रंगाची साडी, हातात बांगड्या अशा पारंपरिक वेशात असलेली ही तरुणी अगदी मन लावून रील करत असल्याचे दिसते.
आतापर्यंत ३ लाख ६० हजार जणांनी हा व्हिडिओ लाइक केला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. तिच्या या व्हिडिओचे कौतुक करत बऱ्याच जणांनी हे एकप्रकारचे टॅलेंट असल्याचेही म्हटले आहे. या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या तरुणीने असे अनेक रील्स व्हिडिओज अपलोड केले आहेत. हे व्हिडिओ पाहून आपल्याला तिचे कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. कामाच्या धावपळीतही स्वत:साठी वेळ काढत आपली आवड जपत ती स्वत:ला फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न करत असावी हे नक्की.