Lokmat Sakhi >Social Viral > 'तौबा तौबा' ! तिची अदा पाहून विकी कौशलनेही केलं कौतुक, पाहा ग्रामीण महिलेचा व्हायरल व्हिडिओ

'तौबा तौबा' ! तिची अदा पाहून विकी कौशलनेही केलं कौतुक, पाहा ग्रामीण महिलेचा व्हायरल व्हिडिओ

Woman Performs Tauba Tauba Steps With Her Kids, Vicky Kaushal Says 'Wow' : सोशल मीडियात व्हायरल असलेल्या तौबा ट्रेण्डचा पाहा हा वेगळा व्हिडिओ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2024 04:59 PM2024-07-26T16:59:11+5:302024-07-26T16:59:30+5:30

Woman Performs Tauba Tauba Steps With Her Kids, Vicky Kaushal Says 'Wow' : सोशल मीडियात व्हायरल असलेल्या तौबा ट्रेण्डचा पाहा हा वेगळा व्हिडिओ...

Woman Performs Tauba Tauba Steps With Her Kids, Vicky Kaushal Says 'Wow' | 'तौबा तौबा' ! तिची अदा पाहून विकी कौशलनेही केलं कौतुक, पाहा ग्रामीण महिलेचा व्हायरल व्हिडिओ

'तौबा तौबा' ! तिची अदा पाहून विकी कौशलनेही केलं कौतुक, पाहा ग्रामीण महिलेचा व्हायरल व्हिडिओ

सध्या रिल्सचा जमाना आहे. आजकाल जो तो वेळ मिळेल तेव्हा मोबाईलवर रिल्स स्क्रोल करुन आपला वेळ घालवतात. या रिल्सच्या माध्यमातून कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. त्याचबरोबर या रिल्सवर जर एक प्रकारचा ट्रेंड आला तर सगळेच नेटकरी तो ट्रेंड फॉलो करतात. अशावेळी सगळेचजण ट्रेंडिंग व्हिडीओ बनवतात. अशीच एक गोष्ट एका ट्रेंडिंग गाण्यावर एक बाई साडी नेसून नाचत असतानाचा तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विक यांच्या 'बॅड न्यूज' चित्रपटातील 'तौबा तौबा' हे गाणं सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. अनेकजण या युनिक हुक स्टेपवर रिल्स तयार करत आहे(This woman's 'Tauba Tauba' dance video has 55 million views. Vicky Kaushal says 'wow').

नुकताच एका महिलेने 'तौबा तौबा' या गाण्यावर अप्रतिम डान्स करत तो व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये, एक महिला तिच्या दोन मुलांसोबत 'तौबा तौबा' गाण्याची हुक स्टेप करताना दिसत आहे. ही महिला इतक्या सहजपणे ही स्टेप करते आहे की ते बघून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या महिलेच्या डान्सच अनेक अभिनेत्यांनी कौतुक केले आहे. विकी कौशलनेही या महिलेच्या नृत्य कौशल्याचं कौतुक केले आहे(Woman Performs Tauba Tauba Steps With Her Kids, Vicky Kaushal Says 'Wow').

ट्रेंडिंग गाण्यांवर महिला साडी नेसून हुक स्टेप करते तेव्हा... 

सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, एक महिला साडीवर तिच्या दोन मुलांसोबत 'तौबा तौबा' गाण्याची हुक स्टेप करताना दिसत आहे. या महिलेच्या चेहऱ्यावर ही स्टेप करताना एक वेगळाच आनंद दिसत आहे. ती महिला या गाण्याची हुक स्टेप एकदम सहज करताना दिसत आहे. रूपाली सिंग नावाच्या या महिलेने विकी कौशलच्या ‘तौबा तौबा’ गाण्यावर डान्स केलाय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पिवळी साडी नेसून या महिलेनं तिच्या दोन मुलांसोबत जबरदस्त असा डान्स केलाय. विकीच्या डान्स स्टेप्स या महिलेनं हुबेहूब कॉपी केल्या आहेत. इतकंच नव्हे, तिच्या दोन मुलांनीही तिला साथ दिली आहे.  शेवटी तिचा नवरा सायकल घेऊन येताना दिसतो. तोसुद्धा पत्नी आणि दोन मुलांचा (A Saree-Clad Woman Recreates Vicky Kaushal’s ‘Tauba Tauba’ Hook Step & We’re Blown Away) डान्स पाहून आश्चर्यचकित झालेला दिसतो. महिलेच्या या डान्स व्हिडीओखाली विकीने ‘वॉव’ अशी कमेंट करून तिला दाद दिली आहे. एवढेच नव्हे तर ही स्टेप बसवणाऱ्या कोरिओग्राफर बॉस्कोने देखील हार्ट आणि हॅप्पी इमोजी लिहून तिच्या कलेचे कौतुक केले आहे (Mom's Tauba Tauba Dance Moves Steal the Show, Even Vicky Kaushal Is Impressed!).   

लादी पुसायचा मॉप काळाकुट्ट होऊन त्यातून कुबट दुर्गंधी येते ? १ सोपी ट्रिक, कष्ट न घेताच मॉप होईल स्वच्छ.. 


सात वर्षे-सात साड्या, निर्मला सीतारामन यांनी बजेटसाठी निवडलेली प्रत्येक साडी खास, हातमागालाही सलाम...

विकी कौशलच्या या फॅनचा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. या व्हिडीओला ४६.७ दशलक्ष इतके व्ह्युज मिळाले आहेत. त्याशिवाय तब्बल २६ लाख लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं असून, ४८ हजार लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. रूपाली सिंग ही गावात राहणारी महिला असून, तिचे सोशल मीडियावरील डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात.

हा व्हायरल होणारा व्हिडीओ बघितल्यानंतर खऱ्या टॅलेंटला संधीची वाट पाहावी लागत नाही हे सिद्ध होतंय. शहरांमध्ये राहणाऱ्या महिलांना बऱ्याच संधी अगदी सहज उपलब्ध होतात. परंतु त्या तुलनेत गावाकडच्या महिलांना तेवढ्या संधी उपलब्ध नसतात. काहीवेळा अशी योग्य संधी हाती न आल्यामुळे त्यांच्यातले छुपे गुण कधीच बाहेर येत नाहीत. असे असले तरीही आता सोशल मिडियामुळे कुणालाही अगदी सहजपणे आपली कला लोकांपर्यंत पोहोचवता येते. अशीच कला या गावच्या महिलेने सादर केली आहे.

Web Title: Woman Performs Tauba Tauba Steps With Her Kids, Vicky Kaushal Says 'Wow'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.