Join us  

महिलेनं ३ वर्षाच्या मुलीला रेल्वे ट्रॅकवर ढकललं आणि....काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2023 10:53 AM

Woman Pushes Off 3 Year Old on to Train Tracks in Portland Video Viral : रेल्वे स्टोशनवर असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली.

ठळक मुद्देया घटनेनंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले असून तिच्यावर कारवाई सुरू आहे असे सांगण्यात येत आहे. चिमुकलीला ढकलतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

सोशल मीडीयामुळे आता जगाच्या एखाद्या कानाकोपऱ्यात घड़णारी कोणतीही गोष्ट अगदी काही मिनीटांत आपल्यापर्यंत पोहोचते. यामध्ये कधी प्राण्यांचे व्हिडिओ असतात तर कधी कोणाच्या डान्सचा व्हिडिओ असतो. काही वेळा रस्त्यावर किंवा रेल्वेशी नाहीतर विमानात घडणाऱ्या अपघातांचाही यामध्ये समावेश असतो. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक लहान मुलगी तिच्या पालकांसोबत रेल्वे स्टेशनवर उभी आहे आणि मागून एक महिला या मुलीला रेल्वेच्या रुळांवर ढकलते (US Woman Pushes Off 3 Year Old on to Train Tracks in Portland Video Viral). 

रेल्वे स्टेशनवरील बाकड्यावर बसलेली महिला अचानकरीत्या या लहानगीला अशाप्रकारे रुळांवर का ढकलते याबाबत अद्याप समजून शकलेले नाही. मात्र ही घटना अमेरीकेच्या पोर्टलंड शहरामध्ये घडली आहे. रेल्वे स्टोशनवर असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही महिला मागून इतक्या जोरात धक्का देते की ही चिमुकली जोरात रेल्वे ट्रॅकवर आदळताना दिसते. नशीब चांगले की यावेळी कोणती ट्रेन येत नाही त्यामुळे तिचा जीव थोडक्यात वाचतो. हे पाहून आपल्या अंगावर काही सेकंदासाठी काटे उभे राहतात. मात्र या महिलेने असे का केले हे मात्र अद्याप समजू शकले नाही. 

कदाचित या मुलीचा जीव घेण्याची या महिलेचा इरादा असावा. पण तिचा जीव थोडक्यात वाचला. या घटनेनंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले असून तिच्यावर कारवाई सुरू आहे असे सांगण्यात येत आहे. ट्विटरवर मॉडर्न पोर्टरेट या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतुकीवर गस्त घालणाऱ्या पोलिसांनी अशाप्रकारच्या धोकादायक गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवे. असे येथील कार्यकर्त्यांचे म्हणणे असल्याचे पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियारेल्वेअपघात