एकदा हरवलेली गोष्ट पुन्हा सापडणं म्हणजे जीवात जीव आल्यासारखा वाटतो. जर आपली आवडती वस्तू हरवली तर ती कधी मिळते असं होतं. १३ वर्षांपूर्वी हरवलेली वस्तू आता सापडली तर तुमची रिएक्शन कशी असेल? अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना अमेरिकेतील आहे. (Woman reunites with came rashe lost in river 13 years ago and the photos still intact)
रिपोर्ट्सनुसार एका महिलेचा कॅमेरा 13 वर्षांपूर्वी हरवला होता. अलीकडेच एका मच्छिमाराला नदीजवळ अशा काही गोष्टी आढळून आल्याने त्यालाही धक्काच बसला. त्याने नीट पाहिले तर तो कॅमेरा होता. त्याने सांगितले की प्रथम त्याला ते काय आहे ते समजले नाही आणि तो फेकून देण्याची योजना आखत होता. पण नंतर उघडल्यावर आतून एक मेमरी कार्ड बाहेर आलं.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचे इतक्या वर्षांनंतरही मेमरी कार्डही सुरक्षित आणि चांगले होते. मेमरी कार्डच्या आधारे मिळालेल्या डेटाच्या आधारे मच्छीमाराने फेसबुकवर संपूर्ण माहिती शेअर केली आणि शोध घेत असताना अखेर कॅमेऱ्याच्या मालकाच्या नजरेस ती फेसबुक पोस्ट पडली. तिनं त्या मच्छिमाराशी संपर्क साधला आणि मग तिने कॅमेरा मिळवला. ही घटना फिल्मी वाटत असली तरी पूर्णपणे खरी आहे.
गिरना बड़ी बात नहीं है, गिरके उठना बड़ी बात है.. रॅम्पवॉक करताना मॉडेल दणकन आदळली, अन्
त्या कॅमेऱ्यातील सर्व फोटो सुरक्षित असल्याचे पाहून तिला आश्चर्य वाटले. या कॅमेऱ्यात काही लग्नाचे फोटो होते तर काही पार्टीचे फोटोही होते. ज्यावेळी हा कॅमेरा हरवला होता, त्यावेळी ही महिला समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेली होती आणि तिच्या हातातून कॅमेरा अचानक सुटला आणि नदीत वाहून गेला. अशा स्थितीत तो कॅमेरा परत मिळण्याचे काही चान्सेस नव्हते. इतक्या वर्षांनी तो कॅमेरा मिळाल्याने ती खूप खूश आहे आणि फोटो पाहिल्यानंतर त्या महिलेनं आपल्या मित्रमैत्रिणींसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.